Live SC Hearing On Maharashtra Political Crisis: सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार!

Supreme Court Verdict On Shivsena MLA: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल लागणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Maharashtra Poltical Crisis Live Update
Maharashtra Poltical Crisis Live UpdateSaam Tv
Published On

सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री राहणार!

राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

१६ अपात्र आमदारांचा निर्णय अध्यक्षांकडे - सुप्रीम कोर्ट

अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या १६ अपात्र आमदारांचा निर्णय अध्यक्षांनी घ्यावा, असे सुप्रीम कोर्टाने निकाल वाचन करताना म्हटलं आहे.

सत्तासंघर्षाचे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे, सुप्रीम कोर्टाचा निर्णय

सत्तासंघर्षाचे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे देण्यात येणार आहे, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.

१६ आमदार अपात्र ठरले तरी...; राज्याच्या माजी मंत्र्यांचे मत

राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज बारामतीत एका खाजगी कार्यक्रमात आले होते. यावेळी माध्यमाशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी विविध विषयांवर भाष्य केले. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर भाष्य करताना जानकर म्हणाले की, शिंदे- फडवणीस सरकारकडे १८५ चा आकडा असून, यामध्ये जरी १६ आमदार अपात्र झाले, तरीही भाजपकडे बहुमत आहे. यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही आणि शिंदे- फडणवीस सरकार स्थिर राहील.

शिंदे-फडणवीस सरकारच महाराष्ट्रात कायम राहणार - राणे

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचाच विजय होणार, शिंदे आणि फडणवीस यांचे सरकार महाराष्ट्रात कायम राहणार, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विटद्वारे व्यक्त केलीय.

सुप्रीम कोर्ट वेगळा निर्णय देईल असे वाटतंय; निकालाआधीच कायदेतज्ज्ञांनी व्यक्त केली शक्यता

विधीज्ञ असीम सरोदे यांनी सुप्रीम कोर्टाच्या येणाऱ्या निकालावर प्रतिक्रिया दिली. न्यायालय वेगळा निर्णय देईल असं वाटतंय. पक्षांतर्गत बंदीसंदर्भात देशातील सगळ्यात वेगळा निर्णय येऊ शकतो, असेही सरोदे म्हणाले.

सरोदे काय म्हणाले?

विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी पत्र पाठवेल, कोर्ट काही वेळ देऊ शकतं, राज्यपालांनी घेतलेल्या फ्लोअर टेस्टबाबत पण निर्णय येऊ शकतो. तो अधिकार कदाचित नरहरी झिरवळ यांच्याकडे येऊ शकतो.

पक्षविरुद्ध कारवाई केल्याचे सरळ-सरळ दिसत आहे. त्यामुळे यावरही कोर्ट निर्णय देऊ शकतं. सुप्रीम कोर्टच अपात्रतेचा निकाल देईल अशी शक्यता

१६ आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय कोर्टच देईल. अन्य आमदार मग अपात्र ठरू शकतात आणि हा निर्णय कोर्ट देईल.

सत्तासंघर्षाचा निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता

सत्तासंघर्षाचा निकाल अर्धा तास उशीर लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. साडेअकरा वाजता निकाल येण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच माजी सरन्यायाधीश ए. एम. अहमदी यांचे निधन झाले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर, दिल्ली सरकार-एलजी वादावर निर्णय देण्यासाठी घटनापीठ एकत्र येईल. त्यानंतर शिवसेना खटल्याचा निकाल दिला जाणार आहे.

एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात, ते ३दिवस जादूटोणा करायला गेले होते- चंद्रकांत खैरे

एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात, ते आता तिन दिवस जादूटोणा करायला गेले होते. एकनाथ शिंदे यांच्या तोंडात पांढरा खडा असतो, ते समोरच्याच वशिकरण करतात. हे छु छा करणारे व्यक्ती आहे, हे मला माहीत आहे असं म्हणालेत.

16 आमदारांचा निकाल इतर आमदारांना लागू होईल - अनिल परब

16 आमदार अपात्र ठरले तर इतरही आमदार अपात्र ठरतील असं अनिल परब यांनी म्हंटलं आहे. सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय 16 आमदारांसाठी असेल तोच निर्णय इतर आमदारांना लागू होईल असं ते म्हणालेत.

काय डोंगर, काय हिरवळ वाट पाहतोय तुमची 'नरहरी झिरवळ', संजय राऊतांचं ट्वीट

काय झाडी, काय डोंगर, काय हिरवळ, ... आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ, असं ट्वीट संजय राऊतांनी केलं आहे. मात्र आज सकाळपासूनच झिरवळ नॉट रिचेबल झाले आहेत. त्यांचे दोन्ही फोन बंद असल्याची माहिती समोर आली आहे.

नरहरी झिरवळ नॉट रीचेबल

आज सकाळी साडेअकरानंतर निकाल लागण्याची शक्यता असल्याने सर्वपक्षीय नेत्यांची धाकधूक वाढली आहे. अशातच विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल आहेत. झिरवळ यांचे दोन्ही फोन बंद आहेत तर ते गावच्या घरीही उपस्थित नाहीत. सत्ता संघर्षाच्या निकालाच्या दिवशी नॉट रीचेबल असल्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

निकालाआधीच ठाकरे गटाकडून सोशल मीडियावर पोस्टर व्हायरल

आज सर्वोच्च न्यायालयात सत्ता संघर्षावर निकाल लागणार आहे. निकाल शिंदे गटाच्या बाजूने लागणार की ठाकरे गटाच्या बाजूने लागणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. अशात दोन्ही गटातील नेते आणि पदाधिकारी निकाल आपल्याच बाजूने लागणार असा दावा करत आहेत. सोशल मीडियावर देखील एक पोस्टर जोरदार व्हायरल करण्यात आले आहे.

शिंदे गटातील 16 आमदार कोण?

एकनाथ शिंदे

अब्दुल सत्तार

तानाजी सावंत

यामिनी जाधव

संदिपान भुमरे

भरत गोगावले

संजय शिरसाट

लता सोनवणे

प्रकाश सुर्वे

बालाजी किणीकर

बालाजी कल्याणकर

अनिल बाबर

संजय रायमुलकर

रमेश बोरणारे

चिमणराव पाटील

महेश शिंदे

सुप्रीम कोर्टाचा निकाल आमच्याच बाजूनं लागणार; आमदार भरत गोगावले यांची प्रतिक्रिया

आज येणारा निकाल आमच्याच बाजूने असेल असा ठाम विश्वास शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांनी व्यक्त केलाय. या निकालानंतर आम्हाला कुठल्या पक्षात जाण्याची किंवा कुणाला सोबत घेण्याची वेळ येणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय.

सत्तासंघर्षाचा फैसला आजच!

राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोणातून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आजच लागणार असल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com