विधानसभा निवडणुकीत आदिती तटकरेंना जिंकून देण्यात मदत केली नसती तर पालकमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला नसता, असं विधान भरत गोगावलेंनी केलं होतं. त्याला मंत्री आदिती तटकरेंनी उत्तर दिलंय. महायुतीचा उमेदवार निवडणून यावा, यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी कामे केली आहेत.
आपल्या महायुतीचं नाव खराब होणार नाही. तसं काम करायचं आहे. मुख्यमंत्री दावोसला गेलेत, ते महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करताहेत. आपलं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्याचवेळी आम्ही, अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या कुरघोड्या करतोय. पण त्यापेक्षा राज्याला पुढे कसं नेता येईल, याचा विचार करावा असं विधान बाल कल्याण मंत्री आदिती तटकरेंनी केलं आहे.
राज्याच्या पालकमंत्रिपदाची दोन दिवसांपूर्वी यादी जाहीर झाली मात्र यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं. लांबणीवर गेलेले पालकमंत्रिपद कधी घोषित होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होतं. पण यादी जाहीर होताच महायुतीत नव्या वादाला सुरूवात झाली. रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून महायुतीत वाद सुरू झालाय. रायगडचं पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांना देण्यात आल्यानंतर शिवसेनेचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी नाराजी व्यक्त केली. तर त्यांच्या समर्थकांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत रस्त्यावर टायर जाळत आपला राग व्यक्त केला.
भरत गोगावले यांना त्यांच्या जिल्ह्यात पालकमंत्रिपदापासून दूर ठेवल्याने त्यांच्या समर्थकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. कार्यकर्त्यांनी रस्त्यांवर जागोजागी निदर्शने करत जाळपोळ केली आणि निषेध केला. त्यामुळे आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांच्या या भूमिकेपुढे सरकारने आपलं एक पाऊल मागे घेत दोन दिवसातच या जिल्ह्यातील पालकमंत्री पदावर स्थगिती आणलीय. आमदार नाराज भरत गोगावले यांनी विधानसभेवरून मोठं विधान केलं.
जर निवडणुकीत आदिती तटकरेंना जिंकून देण्यात मदत केली नसती तर पालकमंत्रिपदाचा तिढा निर्माण झाला नसता. यावर आदिती तटकरेंनी सणसणीत उत्तर दिलंय. याप्रकारचे विधान येणं हे आश्चर्यजनक आहेत. कारण मी आज तेथून मताधिक्याने निवडून आले आहे. त्यात महायुतीचे नेतृत्व असतील. देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे, आमच्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार असतील, त्यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही निवडणूक लढवली. आम्ही सर्वांनी एकमेकांसाठी काम केलं आहे, त्यामुळेच महायुतीला इतकं मोठं मताधिक्य मिळालं.
घटक पक्ष म्हणून आम्ही काम केलं आहे. महायुतीचा उमेदवार निवडणून यावा यासाठी आम्ही सगळ्या पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो, शिंदे सेनेच्या खाली शिवसेना पक्ष असो, किंवा भाजप असो आरपीआय असो, आम्ही एकत्रित काम केलं आहे, त्यामुळे २३७ असं मॅडेट मिळालंय. त्यामुळे याबाबतचं मुल्यमापन आता करण्यात काही अर्थ नाही. पाच वर्षांनी जेव्हा निवडणुका होतील, असं आदिती तटकरे म्हणाल्या.
आता आम्ही निवडून आलो आहोत, आता पुढील पाच वर्ष आम्हाला एकत्रितपणे काम करायचं आहे. आपल्या महायुतीचं नाव खराब होणार नाही. तसं काम करायचं आहे. आज मुख्यमंत्री दावोसला गेले आहेत, ते महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत आहेत. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक व्हावी, आपल्या इथे अधिक रोजगार निर्मिती व्हावी. आपलं प्रतिनिधीत्व करायला ते तेथे गेले आहेत. ते तेथे आमच्या सर्वांचं प्रतिनिधीत्व करत आहेत. त्याचवेळी आम्ही अशा वेगवेगळ्या गोष्टींच्या संदर्भातील काही कुरघोड्या करत मुल्यमापन करून काय झालं असतं.
काय होऊ शकलं असतं. या संदर्भातील खटाटोपमध्ये पडण्यापेक्षा आपल्याला पुढच्या पाच वर्षामध्ये राज्याला पुढे यायचंय. महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून पुढे न्यायचंय, असं मला वाटतं. तसेच या विषयाला महत्त्व दिलं तर निश्चितपणे ते योग्य राहील. आम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात विजय मिळाल आहे. त्यामुळे जनतेसमोर आपण काय उदाहरण ठेवातोय. जनतेला कुठेही वाटयला नको, की आम्ही यांना का निवडणून दिलं. याचा आम्ही जास्त विचार करणं गरजेचं असल्याचं आदिती तटकरे म्हणाल्यात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.