Jayant Patil Angry On Party Workers Video:  Saamtv
महाराष्ट्र

VIDEO: 'शिस्त नाही, दादागिरी करायला आला का?' जयंत पाटील प्रचंड संतापले; भरसभेत कार्यकर्त्यांना झाप झाप झापले!

Jayant Patil Angry On Party Workers Video: शरद पवारांचे विश्वासू शिलेदार जयंत पाटील हे शांत, संयमी नेते म्हणून राज्याच्या राजकारणात परिचित आहेत. विरोधकांवर टीका करतानाही ते शेलक्या शब्दात समाचार घेतात. मात्र जालन्यातील सभेमध्ये जयंत पाटलांचा हा रुद्रावतार पहिल्यांदाच पाहायला मिळाला.

Gangappa Pujari

अक्षय शिंदे| जालना, ता. १९ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची 'शिवस्वराज्य यात्रा' सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. काल ही यात्रा जालना जिल्ह्यामध्ये पोहोचली. जालन्यातील भोकरदन येथे जाहीर सभा झाली. या सभेवेळी काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातल्याने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रचंड संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी जयंत पाटील यांनी तुमच्यात शिस्त नाही म्हणत कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर...

जयंत पाटील प्रचंड संतापले!

याबाबत सविस्तर माहिती अशी की, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची 'शिवस्वराज यात्रा' जालना जिल्हा दौऱ्यावर आहे.जालन्यातील भोकरदन येथे सभेदरम्यान काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांवर चांगलेच संतापले. जयंत पाटील यांनी यावेळी थेट हातात माईक घेऊन कार्यकर्त्यांना झाप झाप झापले.

कार्यकर्त्यांना खडसावले!

तुमच्यात काही शिस्त दिसत नाही, हुल्लडबाजी जास्त आहे. तुमच्यासमोर भाषण करायची इच्छा नाही असे म्हणत तुम्ही इथे दादागिरी करायला आलात का? क्षुल्लक कारणावरुन कोणी पोस्टर धरले म्हणून इथे दंगा करायची काय गरज आहे? असा प्रश्न त्यांनी कार्यकर्त्यांसमोर उपस्थित केला. तर रावसाहेब दानवेंना मदत करायचा धंदा चाललाय तुमचा? असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांवर नाराजी देखील व्यक्त केली.

दरम्यान, शरद पवारांचे विश्वासू शिलेदार जयंत पाटील हे शांत, संयमी नेते म्हणून राज्याच्या राजकारणात परिचित आहेत. विरोधकांवर टीका करतानाही ते शेलक्या शब्दात समाचार घेतात. मात्र जालन्यातील सभेमध्ये जयंत पाटलांचा हा रुद्रावतार पहिल्यांदाच पाहायला मिळाला. या वादाचा व्हिडिओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

Maharashtra Politics : अजित पवार मला टॉर्चर करतात, शिंदेंचा गंभीर आरोप

Maharashtra Politics : रोहित पवारांची वृत्ती औरंगाजेबासारखी, मला अजित पवारांच्या मुलांची चिंता; गोपीचंद पडळकर असे का म्हणाले?

SCROLL FOR NEXT