bhimashankar news  Saam tv
महाराष्ट्र

भीमाशंकर कुणाचं? खेड की आंबेगावचं? राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जुंपली

bhimashankar khed ambegaon news : भीमाशंकर विकास आराखडा मंजुर झाला... मात्र या विकास आराखड्यात भीमाशंकर खेडचं की आंबेगावचं हा वाद पेटलाय. विकासासोबत हद्दींचा हा वाद नेमका काय आहे? विकास आराखड्यावर नेमका कुणाचा डोळा आहे? दादांच्या राष्ट्रवादीचे नेते आमनेसामने कसे आलेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या विकासासाठी तब्बल 288 कोटी 17 लाख रुपयांच्या विकास आऱाखड्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली... मात्र याच विकास आराखड्यासाठीच्या बैठकीनंतर भीमाशंकर नेमकं खेडचं की आंबेगावचं असा राजकीय संघर्ष उफाळून आलाय... आणि त्याला कारण ठरलंय.... खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी घेतलेली भूमिका....भीमाशंकर विकास आराखड्यात आंबेगावचा उल्लेख जोडण्यास खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी संमती दिल्याचा आरोप होतोय... बैठकीत बाबाजी काळे नेमकं काय म्हणाले वाचा

दिलीप वळसे पाटलांच्या विनंतीला मान देऊन बाबाजी काळेंनी मुख्यमंत्र्यांपुढे आंबेगावचा उल्लेख जोडण्याचे मान्य केलं... मात्र भीमाशंकर मंदिर खेड तालुक्यातच असल्याची भूमिका घेत माजी आमदार दिलीप मोहिते-पाटील आक्रमक झालेत..आता याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच जुंपलीय.

भीमाशंकर परिसरातील गावांना सोय़ीसुविधा आंबेगाव तालुक्यातून पुरवल्या जात असल्यानं भीमाशंकरच्य़ा पुढे आंबेगाव तालुका असा उल्लेख जोडण्याची मागणी आहे... मात्र, भीमाशंकर मंदिर हे खेड तालुक्यात येतं...भीमाशंकर विकास आराखड्यामुळे खेड किंवा आंबेगावमध्ये काय बदल होणार? पाहूयात

भीमाशंकर विकास आराखड्यासाठी एकूण 288 कोटी 17 लाख रुपये मंजुर करण्यात आलेत...या पैशांतून कुंभमेळ्यापूर्वी भीमाशंकर परिसराचा कायापालट करण्यासाठी रस्ते, पार्किंग, रोप-वे, पर्यटन सुविधा आणि मूलभूत सुविधांवर भर देण्यात येणार आहे. मे 2027 पर्यंत विकास आराखड्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश आहेत..त्यामुळे भीमाशंकर विकास आराखड्यातून तालुक्यांचा विकास करण्याचा प्रयत्न राजकीय नेत्यांकडून केला जातोय....

एकीकडे कोट्यवधींचा विकास आराखडा मंजूर होऊन भीमाशंकर परिसराचा कायापालट होणार असताना दुसरीकडे मंदिराच्या हद्दीवरून सुरू झालेला हा वाद राजकीय अस्मितेचा मुद्दा बनलाय... त्यामुळे भीमाशंकर नेमकं खेडचं की आंबेगावचं हा वाद आता आणखी चिघळणार का? या राजकीय वादाचे परिणाम भीमाशंकरच्या विकास आराखड्यावर होतात का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मनसेच्या किल्लेदारांनी मुंबईच्या महापौर तावडेंवर फेकली वही, VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार! भरधाव बसची महिलेला धडक, चाकाखाली चिरडून जागीच मृत्यू

Financial Planning : पगार येताच पैसे संपतात? या ५ सवयी बदलू शकतात तुमचं महिन्याचं बजेट

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, तडकाफडकी राजीनामा देत बड्या नेत्याचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश

SCROLL FOR NEXT