Parth Pawar's role in NCP organisational appointments saam tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीत पार्थवरून महाभारत? पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर आमदार नाराज? NCPच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

NCP Internal Rift : राष्ट्रवादीत नवीन नियुक्त्यांवरून राजकारण तापलंय. पार्थ पवारांनी काही दिवसांपूर्वी मुंबई अध्यक्षांची आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यांक्षांची नियुक्ती केली. मात्र याचं नियुक्तीवरून पक्षातील नेत्यांनी कशी नाराजी व्यक्त केलीय? आणि पार्थ पवारांनी नाराजीनंतर काय भूमिका घेतलीय.पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

अजितदादांच्या राष्ट्रवादीत पक्षनेतृत्व आणि वरिष्ठ नेत्यांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलेत. त्याचदरम्यान आता पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवरून वाद निर्माण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत काही आमदारांनी पार्थ पवारांबाबत नाराजी व्यक्त केलीय. ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा न करता परस्पर निर्णय घेतले जात असल्याचं नेत्यांचं म्हणणंय. यामुळे राष्ट्रवादीत कसं महाभारत रंगलय, पाहूयात.

पार्थ पवारांवरून राष्ट्रवादीत नाराजी?

पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची नाराजी

मुंबईचा अध्यक्ष आणि राष्ट्रीय प्रवक्त्याची पार्थ पवारांकडून परस्पर निवड

झिशान सिद्दिकी, उमेश पाटलांच्या निवडीपूर्वी कोअर कमिटीतील सदस्यांना विश्वासात घेतलं नाही.

सर्वांना सोबत घेऊन अनुभवी नेत्यांशी चर्चा न करता निर्णय घेतल्यानं बैठकीत नाराजी.

पार्थ पवारांनी अनेक पदांवर आपल्या विचारांची आणि गटाची लोकं बसवल्याचा आक्षेप.

विशेष म्हणजे पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त होत असताना बैठकीत पार्थ आणि जय पवार स्वत: उपस्थित होते. त्यांनी ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले. आणि यापुढे सर्व निर्णय वरिष्ठांशी सल्लामसलत करूनच घेतले जातील, असा शब्द दिला. मात्र, या अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील वरिष्ठ नेत्यांमधील समन्वय पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. मात्र नियुक्तींवरून कुठलीच नाराजी नसल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी केलाय.

विधान परिषदेतल्या पदवीधर मतदारसंघातील पराभवमुळे पक्षात अस्वस्थता पसरल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच कोअर कमिटीच्या बैठकीनंतर सुनेत्रा पवारांनी आमदारांची बैठक बोलावली. त्यामुळे सुनेत्रा पवार पक्षातली अस्वस्थता कशी दूर करणार? पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीबाबत काय निर्णय घेणार? नाराज नेत्यांची कशी समजूत काढणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News: मोठी बातमी! दिवाळीनंतर मोठा राजकीय भूकंप, भाजप 'या' मोठ्या पक्षासोबत युती करणार

Fact Check: दिवाळीत 10, 20, 50च्या नोटांचा तुटवडा होणार,RBIकडून लहान नोटांची छपाई कमी? काय आहे सत्य?

Maharashtra News Live Update : ऊस दरासाठी नागठाणे येथे 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको; पुणे-बेंगलोर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत

Maharashtra Politics: शिंदेंची मोठी खेळी, उद्धव ठाकरेंना जोरदार झटका; बड्या नेत्यांसह १०० पदाधिकारी हाती घेणार धनुष्यबाण

व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्याच्या 26 वर्षीय मुलानं संपवलं जीवन, धक्कादायक कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT