Ajit Pawar Speech LIVE: महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दोन वर्षात हा दुसरा मोठा भूकंप घडला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत जाण्याचा निर्णय घेत रविवारी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
आज शरद पवार गट आणि अजित पवार गट यांचे मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन सुरु आहे. दरम्यान मुंबईतील सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
मला मनापासून वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं..
मुंबईतील वांद्रे येथील MET कॉलेजमध्ये अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार म्हणाले की, 'मी आता ४-५ वेळा उपमुख्यमंत्री झालो आहे, माझा तर रेकॉर्ड आहे. पण गाडी इथून पुढे काही जात नाही. मला मनापासून वाटतं मी राज्याचा प्रमुख व्हावं. काही गोष्टी राबवायच्या आहेत, म्हणून प्रमुख व्हावं वाटतं. आज राष्ट्रवादी आपल्याला सगळ्यांना मिळून पुढे न्यायचं आहे. पक्ष चिन्ह आपल्याकडे राहायचं आहे, त्याला कुठेही दृष्ट लागू द्यायची नाही, अशा सूचना अजित पवारांनी आपल्या समर्थकांना केल्या आहेत. (Latest marathi news)
पाचव्यांदा घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ..
अजित पवार यांनी पाचव्यांदा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. तर गेल्या साडे तीन वर्षांत अजित पवारांनी तिसऱ्यांदा उपमुख्यपमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापूर्वी २०१० मध्ये पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी उपमुखमंत्रीपदाची शपथ घेतली होती. (Ajit Pawar Speech Live)
त्यानंतर २०१२ मध्ये पुन्हा एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी उपमुखमंत्रीपदाची शपथ घेतली. २०१९ मध्ये पहाटेची शपथविधी चर्चेचा विषय ठरली होती. अजित पवार यांनी पहाटेच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.