Sharad Pawar Vs Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

NCP Conflict : अजित पवार गटाची नवी खेळी; शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करण्याची मागणी, वगळण्यात आलेली ती ३ नावे कोणती?

Political News : प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी शरद पवार यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे केली आहे.

सूरज सावंत

Mumbai News :

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही बाजूने पक्षावर आणि पक्षचिन्हावर दावा केला जात आहे. याबाबतची सुनावणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सुरु आहे. दरम्यान राष्ट्रवादीच्या फुटीत महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या प्रफुल्ल पटेल यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी शरद पवार यांनी राज्यसभेच्या सभापतींकडे केली आहे.

यानंतर अजित पवार गटाने खेळी केली आहे. शरद पवार गटानंतर अजित पवार गटाने देखील लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापती यांच्याकडे शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. (Latest Marathi News)

याचिका दाखल करताना अजित पवार गटाने शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांचं नाव याचिकेतून वगळले आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर कारवाई केल्यास या दोन्ही नेत्यांना सहानभुती मिळू शकते. त्यामुळे या दोघांची नावे वगळल्याची सूत्रांची माहिती आहे.

तर अमोल कोल्हे यांनी शरद पवार गटाला प्रतिज्ञापत्र दिल्यानं त्याचं नाव वगळले. अजित पवार गटाकडून आपल्याकडे लोकसभेत 2 सदस्य असल्याचा दावा केला जात आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राज्यसभेतील शरद पवार वगळता वंदना चव्हाण आणि फौजिया खान यांचं सदस्यत्व रद्द करण्याची तर लोकसभेत श्रीनिवास पाटील, मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. कालच शरद पवार गटाच्या खासदारांनी राज्यसभा सभापती जयदीप धनखड यांची भेट घेत खासदार प्रफुल पटेल यांच्या कारवाईची मागणी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 19: भैया से सैयां...; विकेंड का वारमध्ये सलमान खाननेच केली तान्या मित्तलची पोलखोल

Shocking News : रात्री झोपेतून उठवलं अन् गच्चीवर नेलं, १४ वर्षीय मुलीवर बलात्कार; नातेवाईकाचं भयंकर कृत्य

Katrina Kaif Age: पती विकी कौशलपेक्षा मोठी आहे कतरिना कैफ, दोघांच्या वयात किती आहे अंतर? जाणून घ्या

Maharashtra Live News Update: पुण्यात अजित पवार यांची महत्त्वाची बैठक

Maharashtra Politics: 'उद्या आम्ही कुठे असू सांगता येत नाही...', माणिकराव कोकाटेंचे खळबळजनक विधान

SCROLL FOR NEXT