Sharad Pawar Marathi Batmya  SAAM TV
महाराष्ट्र

Chandrayaan-3: 'यशामध्ये राजकीय पक्षाचे महत्व नसून वैज्ञानिकांचे कष्ट'; चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया

साम टिव्ही ब्युरो

Sharad Pawar On Chandrayaan-3:

चांद्रयान-3 चे यशस्वी लँडिंग झाल्यानंतर देशभरातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकाच जल्लोष सुरू केला आहे. देशभरातील रस्त्यावर नागरिक जल्लोष साजरा करत फटाक्यांची आतिषबाजी करत आहेत. सर्व नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'यशामध्ये राजकीय पक्षाचे महत्व नसून वैज्ञानिकांचे कष्ट आहे, अशा शब्दात शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली. (Latest Marathi News)

भारताची चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्याने जगभरातून कौतुक होत आहे. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यानंतर शरद पवारांनी इस्रोच्या टीमचं कौतुक केलं. शरद पवार म्हणाले,'कधी यश तर कधी अपयश येत. यश आलं म्हणून या देशातल्या वैज्ञानिकांनी कधी जमिनीवरचे पाय हलवले नाहीत. आज चांद्रयान-3 च यशस्वी लँडिंग झालेलं आहे. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या देशातल्या विज्ञानावर लक्ष केंद्रित केलं, वैज्ञानिकांना प्रोत्साहित केलं, त्याच आज चीज झालं'.

'मला नेहरू सेंटरने चांद्रयान-3 चं यशस्वी लँडिंग पाहण्याची संधी दिली. मी भारतातल्या सर्व वैज्ञानिकांचं अभिनंदन करतो आणि आभार मानतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जगात कायम आपण अपडेट असलं पाहिजेत हे इस्रोने दाखवून दिलं. माझ्या मते या माझ्या मते या यशामध्ये कुठल्याही राजकीय पक्षाचे महत्व नसून देशातील वैज्ञानिक आणि मेहनत करणाऱ्या लोकांचे कष्ट आहेत. त्यांचं हे यश आहे. यामध्ये राजकारण न आणता आपण पाहिलं पाहिजे. वैज्ञानिकांचे अभिनंदन आणि आभार, असेही ते म्हणाले.

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर बाळासाहेब थोरात काय म्हणाले?

चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, 'पंडित जवाहरलाल नेहरूंपासून सुरू झालेल्या अंतराळ संशोधनाच्या मोहिमेतील हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. संपूर्ण देशवासियांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद या शास्त्रज्ञांसोबत होते. आजवर देशाच्या विविध पंतप्रधानांनी दूरदृष्टी दाखवत या मोहिमेला आकार दिला. त्या सर्वांचे या निमित्ताने ऋण व्यक्त करायला हवे'.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

तसेच, ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनीही चांद्रयान-३ मोहीम यशस्वी झाल्यानंतर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली. 'चंद्रयान ३ चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित रित्या उतरले. भारतासाठी हा अभूतपूर्व क्षण आहे. भारताचं विज्ञान आणि खगोल क्षेत्रातलं स्थान सिद्ध करणारा आहे. इस्रो, भारतीय वैज्ञानिक आणि सर्व भारतीयांचे खूप खूप अभिनंदन, अशी प्रतिक्रिया आमदार आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत दिली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangli Vidhan Sabha : सांगलीत काँग्रेससमोर उमेदवारीचा पेच; जयश्री पाटील उमेदवारीवर ठाम!

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीत घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने; होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

SCROLL FOR NEXT