Navi Mumbai : पोलीस दलात खळबळ! नवी मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ निरीक्षक निलंबित

Navi Mumbai Police Officer Suspend : नवी मुंबईतील फसवणुकीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करून आरोपींना अटकपूर्व जामीन मिळवून दिल्याचा ठपका ठेवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे.
Navi Mumbai : पोलीस दलात खळबळ! नवी मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ निरीक्षक निलंबित
Navi Mumbai Police Officer SuspendSaam Tv
Published On
Summary
  • फसवणूक तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका

  • तक्रार परस्पर दप्तरी दाखल करून आरोपींना मदत

  • न्यायालयीन सुनावणीला वरिष्ठ अधिकारी अनुपस्थित

  • पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने निलंबनाची कारवाई

विकास मिरगणे, नवी मुंबई

नवी मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्यात आले आहे. यांच्यावर फसवणुकीच्या तक्रार अर्जाची सखोल चौकशी न करता, तो परस्पर दप्तरी दाखल करून आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्यास मदत केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

ब्रम्हानंद नाईकवाडी हे सध्या नवी मुंबई पोलीस मुख्यालयातील नियंत्रण कक्षात कार्यरत आहेत . सप्टेंबर २०२५ मध्ये दाखल झालेल्या फसवणुकीच्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. युनूस कासम सोत व उमेश मनहरलाल उधानी यांच्यात भूखंड तडजोड कराराच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला होता.

Navi Mumbai : पोलीस दलात खळबळ! नवी मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ निरीक्षक निलंबित
Online Shopping Fraud : स्वस्त साडी घेणं महागात पडलं! भुलथापांना बळी पडली अन् खातं रिकामं झालं, तरुणीसोबत नेमकं काय घडलं?

४ सप्टेंबर २०२५ रोजी दिलेल्या तक्रार अर्जावर गुन्हा दाखल न करता, दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी तो अर्ज परस्पर दप्तरी दाखल करण्यात आला. या त्रुटीचा फायदा घेत संबंधित आरोपींनी बेलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळवला होता.

Navi Mumbai : पोलीस दलात खळबळ! नवी मुंबई पोलीस खात्यातील वरिष्ठ निरीक्षक निलंबित
Shocking : स्टॅमिनाच्या गोळ्या खायचा, रात्री अगणित छळ करायचा... वैतागलेल्या बायकोनं नवऱ्यासोबत असं काही केलं की हादरून जाल!

या सुनावणीवेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक नाईकवाडी स्वतः न्यायालयात हजर न राहता दुय्यम अधिकाऱ्यास पाठवण्यात आल्याचा ठपकाही ठेवण्यात आला आहे. यामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे, बेजबाबदार वर्तन ठरल्याने ब्रम्हानंद नाईकवाडी यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com