Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

....पण कोणत्याही राज्यपालांनी माझ्या तोंडात पेढा भरवला नाही, शरद पवारांचा टोला

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी पवार यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. शिवसेना विरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) असा सामना राजकीय वर्तुळात रंगला आहे. यावर बोलताना पवार म्हणाले, पक्षाचा व्हिप पाळावा लागतो. पक्ष म्हणजे विधिमंडळ पक्ष आणि पक्ष संघटना होय. मी पण वेगवेगळ्या शपथा घेतल्या. पण कोणत्याही राज्यपालांनी (Governor) माझ्या तोंडात पेढा भरवला नाही, कधीही फुलांचा गुच्छ दिला नाही, असं म्हणत पवार यांनी नाव न घेता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी टोला लगावला आहे.

तसंच पवार फेसबुकच्या लाईव्हच्या माध्यमातून पुढे म्हणाले, महाराष्ट्र कुस्तीगीर संघाबाबत भारतीय कुस्तीगीर संघाने काही निर्णय घेतले, जे अधिकार राष्ट्रीय समितीला आहेत. मी स्वतः त्या संघटनेचा अध्यक्ष आहे. महाराष्ट्रात आणि देशाबाहेरच्या संघटनेचा अध्यक्ष आहे. या सगळीकडे काम करत असताना त्या कामाचे मी दोन भाग करतो. खेळाच्या संबंधीच्या बाबींपासून दूर जातो,कारण तो माझ्या कामाचा भाग नाही.बीसीसीआय अध्यक्ष असतानाही मी निवड समितीचे काम कधीही केले नाही. माझ्यासारख्या सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या लोकांनी यात पडता कामा नये.शासकीय क्षेत्राकडे काम करताना प्रश्न मांडण्यासाठी,संघटनांना फायदा मिळण्यासाठी मी काम केले.

त्यानंतर पवार पुढे म्हणाले, माझं काम खेळाडूंना मदत करणं आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावणं आहे. कुस्तीगीर संघटनेचा अध्यक्ष असलो तरी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित करणे माझे काम नाही. कुस्तीगीर संघटनेचं काम बघणाऱ्यांच्या तक्रारी राष्ट्रीय पातळीवर गेल्या. अॅक्शन घेण्याचं कारण काय, तर त्यांच्याकडे इथल्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी आल्या. स्पर्धा आयोजित करण्यासाठी जेवढी पावलं टाकायला हवी, तेवढी घेतली गेली नाही. यात कोणतेही राजकारण नाही. विविध पक्षाचे लोक आहेत, पण आम्ही राजकारण आणत नाही.माझ्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आशिष शेलार होते.मात्र आमच्यात कधीही मतभेद झाले नाहीत. यात कोणतेही राजकारण नाही.

मी अध्यक्ष, उपाध्यक्ष रामदास तडस, कुस्तीच्या क्षेत्रात काम करणारे काका पवार आम्ही एकत्र बसून अन्य पदाधिकाऱ्यांची समजूत घालून राष्ट्रीय गैरसमज दूर करून महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला बाहेर कसं काढायचं, हा विचार करू. जिथे दुरुस्तीची आवश्यकता आहे तिथे ती करू. या निर्णयाचा खेळाडूंच्या भविष्यावर परिणाम होणार नाही, असे त्यांना आश्वासित करतो. आमदारांचा सुरत-गुवाहाटी-गोवा हा प्रवास सुखकर होण्यासाठी 'बरीच काळजी'घेतली असं सांगतात. सख्ख्या भावाकडे राहायला परवानगी लागते हे मला माहिती नाही. मुलीकडे राहणं कायदेशीर गुन्हा आहे का हेही माहिती नाही. हे सगळं विचारणं विनोदी आहे, असंही शरद पवार म्हणाले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT