मोठी बातमी! माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्षांची शिक्षा

माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Former Minister Gulabrao gawande
Former Minister Gulabrao gawande saam tv
Published On

अकोला : माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे (Gulabrao gawande) यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पोलीस कर्मचाऱ्याशी वाद घालून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा, पाच हजार दंड व कलम 294 अन्वये दोन हजार रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत.

Former Minister Gulabrao gawande
Latur : कोरोनाचा धोका कायम; बूस्टर डोसकडे ज्येष्ठ नागरिकांनी फिरवली पाठ

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील (Akola) अग्रसेन चौकात ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याशी माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनी हुज्जत घातली होती. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने रामदास पेठ पोलिसांनी याप्रकरणी तक्रार केली होती. या तक्रारीवरुन रामदास पेठ पोलिसांनी (Police) माजी क्रिडा राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

या प्रकरणातील सुनावणीनंतर अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश व्ही.डी.गव्हाणे यांनी सबळ पुरावे आणि साक्षीदारांच्या आधारे माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांना कलम 353 अन्वये दोन वर्षांची शिक्षा,पाच हजार दंड व कलम 294 अन्वये 2000 रुपये दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणातील इतर आरोपी असलेल्या तिघांना पुराव्याअभावी न्यायालयाने सुटका केली आहे. सरकारतर्फे अॅड.दिपक गोटे यांनी काम पाहिले.त्यांना सिएमएस सेलचे राम पांडे व पोलिस ठाण्याचे बळीराम चतारे यांनी सहकार्य केले.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com