Sharad Pawar  Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar On Maratha Aarakshan: आरक्षणाचा निर्णय आम्हीच घेतला होता; शरद पवारांनी जालन्यात करून दिली आठवण

आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्यातील घटनास्थळी आंदोलकांना भेट दिली.

Vishal Gangurde

Sharad Pawar News In Marathi

जालन्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. या घटनेनंतर आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जालन्यातील अंतरवाली सराटी या घटनास्थळी आंदोलकांना भेट दिली. यावेळी उपस्थितांशी बोलताना आरक्षणाचा निर्णय आम्हीच घेतला होता, याची आठवण शरद पवारांनी शिंदे सरकारला करून दिली. (Latest Marathi News)

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज जालन्याच्या दौऱ्यावर आहेत. जालन्यातील मराठा आंदोलकांवर काल पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला. या घटनेत अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. तर यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्याचाही आरोप पोलिसांनी केला. या घटनेत काही पोलीसही जखमी झाले आहेत. या घटनेतील सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर शरद पवार यांनी आज घटनास्थळी जाऊन आंदोलकांशी भेट घेतली. यावेळी उपस्थित लोकांना शरद पवारांनी संबोधित केले. यावेळी शरद पवार उपस्थितांना म्हणाले, ' कालची घटना दुर्देवी आहे. कालची घटना पाहून इथे आलो. आंदोलकांशी बोलणं झालं. शिंदेंनी दिलेलं आश्वासन पूर्ण केलं नाही. एका बाजूनं चर्चा आणि दुसऱ्या बाजूने पोलीस उतरवले. सरकार एकीकडे चर्चा आणि दुसरीकडे लाठीहल्ला करत आहे'.

'रुग्णालयात जाऊन आलो. काही लोकांना छर्रे मारले गेले आहेत. संबंध नसलेल्यांवर लाठीमार करण्यात आला आहे. पोलीस बळाचा वापर योग्य नव्हता. लाठीमार करण्याची गरज नव्हती. हा मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. आंदोलकांनी कायदा हातात घेतला नाही, असे ते म्हणाले.

'आम्ही मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला होता. मात्र, काही जणांनी कोर्टात जाऊन त्यावर स्थगिती आणली. हे आंदोलन स्वार्थासाठी नाही. तर तरुण पिढीच्या भविष्यासाठी आहे. आंदोलन बदनाम होणार नाही, याची काळजी घ्या. आरक्षणासाठी आपण प्रयत्न करुया, असेही शरद पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर भीषण अपघात, कार २०० मीटर लांब चेंडूसारखी उडाली; अपघाताचा थरारक VIDEO

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

Irshalgad Fort : रायगड फिरायला जाताय, मग इर्शाळगड पाहाच

Pune : पुण्यात उच्चभ्रू परिसरात रेव्ह पार्टी, पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकली, ३ महिला अन् २ पुरूषांना बेड्या

Nimish Kulkarni : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा थाटात पार पडला साखरपुडा, होणारी बायको कोण?

SCROLL FOR NEXT