Controversy erupts after NCERT removes the Maratha Empire map from Class 8 history textbook, triggering strong reactions across Maharashtra. Saam Tv
महाराष्ट्र

आठवीच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा गायब

NCERT Remove Maratha Empire Map From Class 8 History Book: इयत्ता आठवीच्या इतिहास पुस्तकातून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवल्याने एनसीईआरटी वादात सापडले आहे. राज्यभर संताप व्यक्त होत असून शैक्षणिक व राजकीय प्रतिक्रिया तीव्र झाल्या आहेत.

Omkar Sonawane

ओंकार कदम, साम टीव्ही

इयत्ता आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकातून मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शवणारा नकाशा हटवण्याचा निर्णय घेत नॅशनल कौन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंगने पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या निर्णयामुळे राज्यात संतापाची लाट उसळली असून शैक्षणिक आणि राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मराठा साम्राज्याचा इतिहास हा केवळ अभ्यासाचा विषय नसून तो स्वाभिमान आणि पराक्रमाचं प्रतीक मानला जातो.

अशा वेळी विद्यार्थ्यांना मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार दाखवणारा नकाशाच अभ्यासक्रमातून हटवण्यात आल्याने इतिहास पुसण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला जात आहे.यावर छत्रपती घराण्याकडूनही आक्रमक भूमिका घेतली गेली आहे. छत्रपती वृषालीराजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. "मराठा साम्राज्य हा केवळ इतिहास नसून आमचा स्वाभिमान आहे.

राजस्थानमधील विजयाची वस्तुस्थिती नाकारणे चुकीचे आहे. कोणत्याही दबावाखाली इतिहास बदलला जाऊ नये," असे त्यांनी स्पष्ट केले. अनेक राजपूत राजांनी मराठांचे साम्राज्य स्विकारले होते. ही वस्तूस्थिती आहे. ती कुणी ही बदलू शकत नाही. असं असताना हा इतिहास बदलण्यासाठी कुणाचा दबाव आहे अशी विचारणा त्यांनी केली.

या प्रकरणी कायदेशीर बाबी तपासून पुढील पाऊल उचलणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वृषाली राजे भोसले यांनी या निर्णयाचा तीव्र निषेध करत, “मराठा साम्राज्य हा आमचा स्वाभिमान आहे. कोणत्याही दबावाखाली इतिहास बदलला जाऊ नये,” असा इशारा दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दुधाचा की कोरा? वजन कमी करण्यासाठी कोणता चहा सर्वात फायदेशीर? Black Tea Vs Milk Tea Benefits

Maharashtra News Live Update: मुंबईत बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप, रिक्षा चालकांकडून प्रवाशांची लूट

'माझ्या मृत आईच्या दुःखाचा राजकीय बाजार मांडू नका!'; सुषमा अंधारेंवर खासदार आष्टीकरांचा पुत्र भडकला

Mowgli Girl: दहा वर्षांपूर्वी जंगलात सापडलेल्या ‘मोगली गर्ल’चा मृत्यू; १८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Frankie Recipe: लहानामुलांसाठी या विकेंडला घरच्या घरी बनवा टेस्टी फ्रँकी, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT