महाराष्ट्र

Heatwave In Nagpur: नवतपात सूर्याचा कहर, नागपुरात २४ तासांत १० जणांचा मृत्यू

Heatwave Havoc in Vidarbha: नवतपादरम्यान नागपूरमध्ये तीव्र उष्णतेची लाट पसरली आहे. गेल्या २४ तासांत उष्माघाताने १० जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. विदर्भात ४४°C पेक्षा जास्त तापमानाचा कहर सुरूच आहे.

Bharat Jadhav

  • नागपुरात उष्णघातामुळे २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला.

  • नागपूरचा पारा ४५.७ अंशांवर पोहोचला असून विदर्भात भीषण उष्णतेची लाट आहे.

  • विदर्भातील ११ शहरांचे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले आहे.

पराग ढोबळे, साम प्रतिनिधी

वाढत्या उष्णतेमुळे अंगाची लाही लाही होत असून उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांचा बळी गेला आहे. नागपुरात नवताप सु्र्याने कहर केला आहे. नवतपाच्या सुरुवातीलाच विदर्भात भीषण उष्णतेचा प्रकोप दिसून येत आहे. नागपुरात उष्णघातामुळे २४ तासांत १० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकाडा वाढण्याची शक्यता आहे. यंदा हिट वेव्हकॅब दिवस वाढल्याने नागरिकांच्या जीवला धोका पोहचत आहे. नागपूरचा पारा ४५.७ अंशांवर, उष्णतेने जनजीवन विस्कळीत झाले आहे तर विदर्भातील ११ शहरांचे तापमान ४४ अंशांच्या पुढे गेले आहे.

उष्ण लाटेचा फटक्याने भिक्षेकरी आणि रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचाही मृत्यू झालाय. रेल्वे स्थानकावर ५ जणांचा मृत्यू झालाय. यात तीन प्रवासी आणि दोन अज्ञात व्यक्तींचा मृतांमध्ये समावेश. रेल्वे प्रवाशी हे अमृत भारत, तामिळनाडू आणि अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमधील होते असं सांगण्यात येत आहे. नागपुर शहारातील शहरातील विविध भागांत आणखी ५ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, सक्करदरा, ताजबाग, लकडगंज आणि कळमन्यात मृतदेह आढळले आहेत. डॉक्टरांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुपारच्या उन्हात बाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागाने नोंदवलेल्या अंदाजानुसार आज (ता. २८) वाशीम, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने खबरदारीचा इशारा (रेड अलर्ट) कायम आहे.

अकोला, अमरावती, यवतमाळ जिल्ह्यांत उष्ण लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा (ऑरेंज अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे. बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये उत्तर प्रदेशातील बांदा येथे देशातील उच्चांकी ४७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. उत्तर तमिळनाडू आणि परिसरावर चक्राकार वाऱ्याची स्थिती तयार झाली आहे. आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. उत्तर बिहारपासून तेलंगणापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT