School yandex
महाराष्ट्र

School: देशातील 28 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालय ओपन होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजूरी

School: डॉ. हेमंत सावरा यांनी संसदेत मागणी केली होती. या मागणीला यश आले असून तसे परिपत्रक परिपत्रक जारी केले आहे.

Dhanshri Shintre

खासदार हेमंत सवरा यांनी केलेल्या मागणीला यश मिळाले आहे. ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची गैरसोय लवकर दूर होणार. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये पालघर लोकसभेचे खासदार डॉ. हेमंत विष्णु सवरा यांनी अधिवेशनामध्ये ठाणे व पालघर जिल्ह्यासाठी स्वतंत्रपणे जवाहर नवोदय विद्यालय स्थापन करावे यासाठी आग्रही मागणी केली होती. सदर केलेल्या मागणीला दुजोरा देऊन केंद्रीय मंत्रिमंडळाने ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र विद्यालयास मंजूर दिली आहे.

ज्या जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये नाहीत, अशा 28 जिल्ह्यांमध्ये नवोदय विद्यालये स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली असून नवीन नवोदय विद्यालय मंजुरीमध्‍ये ठाणे व पालघर जिल्‍ह्याचा समावेश आहे. डॉ. हेमंत सावरा यांनी संसदेत मागणी केली होती. या मागणीला यश आले असून तसे परिपत्रक परिपत्रक जारी केले आहे.

देशामध्‍ये नवीन 28 नवोदय विद्यालये स्थापण्यासाठी एकूण अंदाजे २३५९.८२ कोटी इतका निधी लागणार आहे. हा निधि २०२४-२५ ते २०२८-२९ या पाच वर्षांच्या कालावधीमध्ये खर्च केला जाईल. यामध्ये भांडवली खर्चासाठी १९४४.१९ कोटी रुपयांची तरतूद ठेवली आहे. तर परिचालन खर्च रु. ४१५.६३ कोटी उपलब्ध करुन दिले आहेत.

नवोदय विद्यालय ही पूर्णतः निवासी, सह-शैक्षणिक शाळा आहे. ज्यामध्ये हुशार मुलांना इयत्ता सहावी ते बारावीपर्यंतचे उत्तम दर्जाचे आधुनिक शिक्षण दिले जाते. प्रामुख्याने ग्रामीण भागातील, त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक-आर्थिक स्थितीचा विचार न करता या शाळांमध्ये निवड चाचणीच्या आधारे प्रवेश दिले जातात. देशात दरवर्षी अंदाजे ४९६४० विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालयांमध्ये इयत्ता सहावीमध्ये प्रवेश दिला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

Maharashtra Live News Update: लक्ष्मण हाकेंविरोधात खामगाव शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

Ganesh Visarjan 2025: गणपती विसर्जनाला राशीनुसार करा 'हे' खास उपाय; पाहा तुमच्या राशीप्रमाणे काय केलं पाहिजे?

Samsung Galaxy S25 FE 5G मोबाईल लाँच, अपग्रेडेड बॅटरीसह जाणून घ्या खास फिचर्स आणि किंमत

Anant Chaturdashi 2025 live updates : मुंबईच्या राजाची विसर्जन मिरवणूक सुरु

SCROLL FOR NEXT