Navneet Rana  saam Tv
महाराष्ट्र

Navneet Rana: येत्या काळात मोदींच्या केबिनबाहेर बॅगा घेऊन येतील...; निवडणूक निकालावरून नवनीत राणांचा निशाणा कुणावर?

Navneet Rana On Election Results : येत्या काळात हे सर्व जण मोदींच्या केबिनबाहेर बोऱ्या-बिस्तारा घेऊन आले तर नवल वाटायला नको, असा उपरोधिक टोला नवनीत राणा यांनी लगावला.

Ruchika Jadhav

Political News:

लोकसभा निवडणुकीची सेमिफायनल म्हणून ५ राज्यांच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे. अशात काल लागलेल्या निकालत ३ ठिकाणी भाजपचा विजय झाला. आलेल्या निकालावरून खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत विरोधकांवर निशाणा साधला आहे.

येत्या ६ डिसेंबरला इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीवरून नवनीत राणा यांनी नरेंद्र मोदी वाघ आहेत आणि अशा व्यक्तींचा ते एकटेच सामना करू शकतात, अशा शब्दांत विरोधकांना इशारा दिलाय. तसेच आलेल्या निकालानुसार, येत्या काळात हे सर्व जण मोदींच्या केबिन बाहेर बोऱ्या बिस्तारा घेऊन आले तर नवल वाटायला नको, अशी टीकाही नवनीत राणा (Navneet Rana) यांनी केली आहे.

मोदी है तो मुमकिन है

"या देशात मागच्या ९ वर्षांत मोदींनी केलेल्या कामामुळे लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे. सामान्य लोकांची भूमिका आहे की, आम्हाला मोदी पाहिजेत. मोदींच्या कामावर ग्यारंटी आलीये. त्यामुळं मोदी है तो मुमकिन है, असं चित्र निर्माण झालंय.", असं नवनीत राणा म्हणाल्या.

अमित शाह यांनी केलेल्या प्लानिंग आणि स्ट्रॅटर्जीचा हा विजय आहे. हाच रेपो २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही दिसेल. देशाचे पंतप्रधान दुसऱ्या देशात जाऊन देशाचं नेतृत्व करत असतात. त्यांच्यावर स्टेजवरून अपशब्द म्हणणं हे लोकांना आवडलं नाही. त्यामुळे लोकांचा विश्वास राहिलेला नाही आणि विरोधकांचा पराभव झाला, अशा शब्दांत राणा यांनी विरोधकांच्या पराभवाचं कारण सांगितलंय.

काल ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला. यातील तीन ठिकाणी भाजपने घवघवीत यश मिळवलंय. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणावर या निकालाचा काही परिणाम होणार का? असा प्रश्न माध्यामांशी संवाद साधताना नवणीत राणा यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना त्यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात काही लोक सकाळी सकाळी पोपट पंची करत होते. त्यांची सगळ्यांची तोंडं बंद झाली आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंसह काही विरोधक थोड्या दिवसांनी मोदींच्या कार्यालयाबाहेर बॅगा घेऊन उभे राहतील, अशी टीकाही नवनीत राणा यांनी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT