Vanchit Bhaujan Aghadi : इंडिया आघाडीत आम्ही जायला तयार आहे पण वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत घेण्यास तयार नाहीत असे मत वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar In Satara) यांनी आज (शनिवार) साताऱ्यात व्यक्त केले. सातारा येथे वंचितने आयाेजिलेल्या सभेसाठी आंबेडकर हे सातारा येथे आले हाेते. या सभेपूर्वी आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला. (Maharashtra News)
प्रकाश आंबेडकर म्हणाले इंडिया आघाडीत नेमका विरोध शरद पवारांचा आहे की भाजपचा हे मला माहिती नाही पण आम्हांला जर इंडिया आघाडीत घेतले नाही तर नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) इंडिया आघाडी ठेवणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त एनसीपीच्या भुमीकेवरच प्रश्न चिन्ह उपस्थित केले. राष्ट्रवादी काॅंग्रेस इंडियाच्या भुमिकेसोबत दिसत नाही, अडाणींच्या अर्थव्यवस्थे सोबत एनसीपी आहे का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
इंडिया मध्ये ख-या अर्थानं नॅरेटीव्ह लोकांसमोर आलं पाहिजे असे आंबेडकर यांनी नमूद केले. ते म्हणाले इंडीया मधील काही जण धाडस करतात पण काही जणांना थांबवण्याचा निर्णय यामध्ये दिसतोय. मुंबईत झालेल्या इंडियाच्या बैठकीत अडाणीची अर्थव्यवस्था देशाला धोकादायक आहे अशी भुमिका मांडण्याचा प्रयत्न केला.
या बैठकीत इंडियाचा सगळ्या घटकांनी पाठींबा दिला परंतु एनसीबी ही या इंडियाच्या भुमिकेसोबत आपल्याला दिसत नाही. एनसीपीने अडणींसोबत आहे असं दाखवुन दिल्याचे आंबेडकर यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.