Navneet Rana: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ‘हिंदू हृदय सम्राट' का म्हटलं? नवनीत राणांनी सांगितलं कारण

Navneet Rana : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानमधील हवामहल विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज (हाथोज धाम) यांच्या प्रचारासाठी गेले होते. तेथे त्यांचा उल्लेख हिंदू हृदय सम्राट म्हणून करण्यात आला होता. त्यामागील कारण नवनीत राणा यांनी सांगितलंय.
Navneet Rana
Navneet Rana saam Tv
Published On

(तरबेज शेख)

Mp Navneet Rana :

भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजस्थान दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी लावलेल्या बॅनरवर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘हिंदू हृदय सम्राट’असा करण्यात आला होता. त्यावरून ठाकरे गटाकडून मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली गेली. (Latest News)

भाजप उमेदवाराच्या बॅनरवर एकनाथ शिंदेंचा 'हिंदू हृदय सम्राट' का उल्लेख करण्यात आला होता, त्याचं कारण खासदार नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. त्या नाशिक येथे माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी त्या मागील कारण सांगितलं. त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी त्यांचा उल्लेख 'हिंदू शेरनी' असा का उल्लेख केला त्याचंही कारण सांगितलं.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

'हिंदू हृदय सम्राट'चा उल्लेख करण्यामागे कार्यकर्त्यांची भावना असते, म्हणून हे टाकलं जातं. मुख्यमंत्री हे मोठं पद आहे, त्यांनी एवढ्या वर्ष बाळासाहेब यांच्यासोबत काम केलंय. चांगल्या कामाचं प्रतिबिंब दिसत असते, असं त्या म्हणाल्या. तर आपल्याला 'हिंदू शेरनी' का म्हटलं त्याचेही कारण त्यांनी सांगितले. मी हिंदुस्थानमध्ये राहते आणि हिंदू आहेच. कार्यकर्त्यांचे विचार आहे, त्यांनी बॅनर लावले असल्याचं त्या म्हणाल्या.

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा पठण का केलं होतं त्यावरही भाष्य केलं. जे संकट माझ्या महाराष्ट्रावर होतं, त्यासाठी मी हनुमान चालीसा पठण केली होती. आज संकट दूर होऊन शेतकऱ्यांना जी मदत हवी आहे, ती मिळत आहे. आताचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे घरात बसणारे नाहीत, ते बाहेर फिरून लोकांची मदत करणारे आहे.आता मी हनुमान चालीसा जिथं वाचायची आहे, तिथं आरामात, शांततेत वाचते, असं त्या म्हणाल्या.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजस्थानमधील हवामहल विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार बालमुकुंदाचार्य महाराज (हाथोज धाम) यांच्या प्रचारासाठी गेले होते. शिंदेच्या प्रचार सभेची माहिती देणाऱ्या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष जे पी नड्डा, वसुंधरा राजे यांच्यासह काही भाजप नेत्यांचे फोटो होते. त्याखाली 'हिंदू हृदय सम्राट माननीय एकनाथ शिंदे जी का हवामहल की पावन धारा पर हार्दिक स्वागत' असं लिहिण्यात आलं होतं.

या पोस्टरवर राज्यात ठाकरे गटाकडून शिंदेवर सडकून टीका करण्यात आली होती. पक्ष चोरला, नाव चोरलं, बाप चोरायचा प्रयत्न केला. आता हेही? किती तो निर्लज्जपणा? जगात 'हिंदु हृदय सम्राट' फक्त एकच. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे! त्यांच्या आधी ना कोणी होता, त्यांच्यानंतर ना कोणी होऊ शकेल! जनता दूधखुळी नाहीये, सगळ्याचा हिशोब होणार!" टीका ठाकरे गटाने केली होती.

Navneet Rana
Bachchu Kadu News: नवनीत राणा- बच्चू कडू यांच्यात पुन्हा संघर्षाची ठिणगी; राजकारण का तापलं?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com