शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा एक व्हिडिओ चर्चेत आला आहे. या व्हिडिओत इच्छूक शिक्षक महिला उमेदवारावर मंत्री केसरकर अरेरावी करताना दिसत आहे. साम टीव्हीने याबाबत वृत्त दिलं होतं. साम टिव्हीच्या या बातमीची दखल खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली आहे. सुप्रिया सुळेंनी ही बातमी ट्विट करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? असा सवाल करत निशाणा साधला आहे. (Latest Marathi News)
बीडमध्ये काल शिक्षक भरतीवरून भावी शिक्षक आणि शिक्षणमंत्री केसरकर आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. या व्हिडिओत इच्छूक शिक्षक महिला उमेदवाराला मंत्री केसरकर हे 'डिसक्वालिफाय' करण्याची धमकी देताना दिसत आहेत. यावरून दीपक केसरकरांनी तातडीने संबंधित मुलीची जाहीर माफी मागावी, अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली आहे.
सुप्रिया सुळे ट्विटमध्ये म्हणाल्या, 'महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला 'डिसक्वालिफाय' करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून 'या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?' असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्री महोदय आज काल जाहीर सभेतून जनतेला धमकावताना दिसतात'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे, तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहीर माफी मागितली पाहिजे, अशा त्या पुढे म्हणाल्या. (Political News)
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.