(संजय जाधव)
या देशातील रेशन व्यवस्था बंद केली पाहिजे,८० कोटी लोक बसून खात असतील तर हा देश कर्तुत्ववान नागरिकांचा नसून, हा देश गरीब देश आहे असं स्पष्ट होतं आहे, अशी टीका केंद्र सरकारवर माजी कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी केलीय. शेतकऱ्यांच्या समस्यांवर बोलताना सदाभाऊ खोत यांनी पंतप्रधान मोदींच्या योजनावर अप्रत्यक्षपणे टीका केलीय. (Latest News)
बुलढाणा जिल्ह्यातील सोमठांना येथे रविकांत तुपकर हे अन्यत्याग आंदोलन करत आहोत. तुपकर यांना भेटण्यासाठी सदाभाऊ खोत आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांनी तुपकर यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. रविकांत तुपकर हा अलीकडच्या काळातला लढवय्या शेतकरी नेता आहे. त्यामुळे मी त्यांना भेटायला आलो असल्याचं खोत म्हणाले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पुढे बोलताना, देशातील ८० कोटी माणसं दोन वेळेस खाण्यासाठी कमवू शकत नसतील तर या देशात किती दारिद्र वाढलं आहे, असं स्पष्ट होत आहे. म्हणून माणसाच्या श्रमाला दाम द्या, त्यांच्या हाताला काम द्या. माणसं भिकारी बनवू नका, भीक मागणारे बनवू नका. देशातील माणसांना कर्तृत्ववान बनवा, स्वाभिमानी बनवा तरच देश बलशाली बनू शकतो असे स्पष्ट प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली.
खोत यांनी शेतकऱ्यांच्या समस्या माध्यमांसमोर मांडल्या. शेतकऱ्यांना वारंवार आंदोलन करावं लागते. यामुळे सरकारने शेतकऱ्यांच्या समस्या ऐकल्या पाहिजेत. यासाठी सरकारने चर्चेची दरवाजे खुले करावेत. शेतीचा प्रश्न मोठा जटील आहे, पण व्यवस्था मात्र बिहारी असल्याचं टीका सदाभाऊ खोत यांनी केली.
शेतीवर जीवन जगणारा समाज फक्त ४० टक्के आहे, त्यामुळे या देशात आयात खाऊची संख्या वाढलीय. रेशन फुकट मिळत असल्यानं देश गरीब असल्याचं स्पष्ट होत असतं. फुकट मिळणं हे अफूच्या गोळ्या सारखे आहे. नागरिकांना सगळ फुकट वाटण्यामध्ये सर्व राजकीय नेत्यांमध्ये ओढ लागलीय. यामुळे देश गरीब होत आहे.ऑस्ट्रेलियात सुद्धा असेच फुकट मिळत होत, त्यामुळे तेथील समाज व्यसनाधीन झालाय असं खोत यावेळी म्हणालेत.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.