Unseasonal Rain Hits Buldhana: वीज काेसळून शेगाव, खामगाव तालुक्यातील ३० मेंढ्यांचा मृत्यू

मेंढपाळांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा केली आहे.
hail storming unseasonal rain lightning cause 30 sheep dies in buldhana
hail storming unseasonal rain lightning cause 30 sheep dies in buldhanasaam tv
Published On

Unseasonal Rain In Buldhana :

बुलढाणा जिल्ह्यातील लाखो शेतकरी व रहिवाशांना रविवारी रात्रभर निसर्गाचे भीषण तांडव अनुभवायला मिळाला. विजांचा कडकडाट, सोसाट्याचा वारा, गारांचा वर्षाव यासह मुसळधार पावसाने जिल्ह्याच्या तेराही तालुक्यात हजेरी लावत पिकांची नासाडी केली. यामध्ये ३० पेक्षा जास्त मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे. अनेक गावांत रात्रीपासून खंडित झालेला वीज पुरवठा अद्याप सुरळीत झालेला नाही. (Maharashtra News)

रविवारी रात्री पासून सोमवारी पहाटे पर्यंत अवकाळी पावसानं बुलढाणा जिल्ह्यात हजेरी लावली. यामध्ये शेगाव आणि खामगाव तालुक्यातील मेंढपाळांच्या च्या एकूण ३० मेंढ्या दगावल्या आहेत. रात्रीच्या सुमारास गारपीट आणि वीज कोसळल्यानं मेंढ्या दगावल्या आणि अनेक मेंढ्या जखमी झाल्या आहेत. यामुळं मेंढपाळाचं लाखोंचे नुकसान झालं आहे.

hail storming unseasonal rain lightning cause 30 sheep dies in buldhana
Shetkari Samvad Yatra: शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी किसान काँग्रेसचा 'एल्गार', ४ डिसेंबरपासून नंदुरबार ते नागपूर शेतकरी संवाद यात्रा

खामगाव तालुक्यातील शिराळा शिवारातील सैलानी कृष्णाजी हटकर यांच्या पाड्या वरील वीस मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहेत. शेगाव तालुक्यातील टाकळी विरो येथील शेतात मेंढपाळ कुटुंब संतोष हनुवती हटकर वास्तव्यास आले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

रात्रीच्या अवकाळी पावसाने व गारपिटीने त्यांच्या अनेक मेंढ्या दगावल्या. अद्याप पर्यंत पंचनामा झालेला नसून मेंढपाळ बांधवांवरती अस्मानी संकट कोसळले आहे. त्यामुळे हवालदिल झालेल्या मेंढपाळांनी शासनाच्या मदतीची अपेक्षा केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

hail storming unseasonal rain lightning cause 30 sheep dies in buldhana
Kokan Poltitics: चर्चा तर हाेणारच! 'ओम गणेश' वर दीपक केसरकर; तब्बल 12 वर्षानंतर नारायण राणेंची घेतली भेट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com