Panvel News Saam tv
महाराष्ट्र

Panvel News : प्राचार्याकडून सातत्याने त्रास, शिवीगाळ; नर्सिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्याने संपविले जीवन, प्राचार्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

Navi Mumbai News : वसतीगृहात राहत असलेल्या खोलीतच या विद्यार्थ्याने कमर पट्ट्याच्या सहाय्याने खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती

Rajesh Sonwane

विकास मिरगणे 
नवी मुंबई
: पनवेल तालुक्यातील पोयंजे गावात असलेल्या सारा नर्सिंग कॉलेजमध्ये बीएससी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ३ जूनला उघडकीस आली आहे. प्राचार्यांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या विद्यार्थ्याने कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये गळफास घेऊन आपले जीवन संपवले. आता या प्रकरणी प्राचार्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पनवेल तालुक्यातील पोयंजे येथील सारा नर्सिंग महाविद्यालयातील प्राचार्याकडून होणारी शिवीगाळ आणि त्रास याला कंटाळून एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. वसतीगृहात राहत असलेल्या खोलीतच या विद्यार्थ्याने कमर पट्ट्याच्या सहाय्याने खिडकीच्या गजाला गळफास घेऊन आयुष्य संपवलं. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणी मृत तरूणाच्या कुटुंबाने पोलीस ठाण्यात धाव घेत प्राचार्याविरोधात तक्रार दाखल केली.

प्राचार्य विरुद्ध ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल 
प्राथमिक माहितीनुसार विद्यार्थ्याने कॉलेजमधील महिला प्राचार्य निशा नायर यांच्या सततच्या छळाला कंटाळून हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर मृत विद्यार्थ्याच्या आईने पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर अखेर प्राचार्य नायर यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून तपास सुरु 
सदरच्या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास पनवेल तालुका पोलीस करत आहेत. मात्र या प्रकरणी प्राचार्यावर आता काय कारवाई केली जाणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

Mamachya Govyala Jauya: कॉमेडी, अॅक्शन आणि सस्पेन्सचा फुल ऑन डोस! 'मामाच्या गोव्याला जाऊया'च्या ट्रेलर प्रदर्शित

SCROLL FOR NEXT