Navi Mumbai News Saam tv
महाराष्ट्र

Crime News : डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने महिलेची फसवणूक; १ लाख रुपये घेऊन पसार, एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Navi Mumbai News : फसवणूक करण्यासाठी गुन्हेगार वेगवेगळे फंडे आजमावत असून समोरच्या व्यक्तीला विश्वासात घेत पैसे उकडत आहेत. अशाच प्रकारे डॉलर्स एक्सचेंजच्या नावाने फसवणूक करण्याचे समोर आले

Rajesh Sonwane

विकास मिरगणे 
नवी मुंबई
: वाशी कोपरी गावात मेस चालवणाऱ्या एका महिलेची तब्बल १ लाख रुपयांत फसवणूक करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. तीन अनोळखी व्यक्तींनी बनावट डॉलर्स एक्स्चेंजच्या आमिषाने हि फसवणूक केली असून या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नवी मुंबई एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सदर महिला बदलापूर (पूर्व) येथील शिरगावची रहिवासी असून कोप्री गावात मेस चालवते. याच दरम्यान तिघा अनोळखी व्यक्तींनी महिलेशी फोनवरून संपर्क साधला. यात त्यांनी त्यांच्याकडे अमेरिकन डॉलर्स असल्याचे सांगितले. १ लाख रुपयांच्या बदल्यात १,६०० यू.एस. डॉलर्स ($२०च्या नोटा) देण्याचे आमिष त्यांनी दाखवले.

महिलेने दिली १ लाखांची रोख रक्कम 
महिलेला विश्वासात घेत तिघा जणांनी महिलेच्या मेसमध्ये येऊन प्रत्यक्ष व्यवहार करण्यास तयारी दर्शविली. यामुळे महिलेनं विश्वास ठेवून अमेरिकन डॉलर मिळणार यावर विश्वास ठेवत १ लाख रुपये रोख रक्कम दिली; मात्र पैसे घेतल्यानंतर तिघेही डॉलर्स न देता घटनास्थळावरून फरार झाले. अचानकपणे घडलेल्या या प्रकाराने महिला भांबावून गेली होती. यानंतर तिने लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.

पोलिसांकडून तपास सुरु 

त्यानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. दरम्यान अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, आरोपींनी संपर्कासाठी वापरलेला फोन क्रमांकही तपासात आहे. ही घटना पूर्वनियोजित फसवणुकीची असल्याचे पोलिसांचे प्राथमिक निरीक्षण आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs Pakistan : नाद करा, पण आमचा कुठं! भारताचा पाकिस्तानवर एकतर्फी विजय; अभिषेक- गिलने धू धू धुतलं

Laxman Hake: आरक्षणाचा वाद वाढणार; SC मधून 'या' समाजालाही आरक्षण द्या; लक्ष्मण हाकेंची नवी मागणी

India vs Pakistan: फक्त एका चेंडूनंतर थांबवण्यात आला होता सामना; कारण आलं समोर

Sahibzada Farhan Gun Celebration: वाह दुबे जी वा! स्लोअर बॉलवर ढेर अन् म्हणे 'गन' सेलिब्रेशन|Video Viral

Bhadrapad Pola : बैलाची पूजा नव्हे, शेतकऱ्यांच्या कष्टाचा गौरव; पुण्यात भाद्रपद पोळा उत्साहात साजरा, VIDEO

SCROLL FOR NEXT