Bribe Case : गॅस एजन्सीवर कारवाई टाळण्यासाठी पावणेदोन लाखांची लाच; मुख्य निरीक्षण अधिकारी एसीबीच्या ताब्यात

Mumbai News : मुख्य निरीक्षण अधिकारी निकम याने तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर गतवर्षी ऑक्टोबरमध्ये आणि नातेवाईकांच्या गॅस एजन्सीवर ऑगस्ट महिन्यात कारवाई केली होती, हि कारवाई टाळण्यासाठी पैशांची मागणी
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

संजय गडदे

नवी मुंबई : दोन वेगवेगळ्या गॅस एजन्सीची तपासणी करत त्यांच्यावर कारवाई प्रस्तावित होती. हि कारवाई टाळण्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागातील मुख्य निरीक्षण अधिकाऱ्याने तब्बल १ लाख ७५ हजार रुपये लाचेची मागणी केली. सदरची रक्कम स्वीकारताना मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने या अधिकाऱ्यास रक्कम स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे. 

अन्न व नागरी पुरवठा विभागातील मुख्य निरीक्षण अधिकारी विनायक वसंत निकम (वय ५४) असे एसीबीने ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान एसीबीने दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील तक्रारदार कांदिवली येथील गॅस एजन्सीमध्ये व्यवस्थापक म्हणून काम करतात. तर त्यांच्या नातेवाईकांची ठाणे येथे गॅस एजन्सी आहे. तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये आणि नातेवाईकांच्या गॅस एजन्सीवर ऑगस्ट महिन्यात विनायक निकम यांनी कारवाई केली होती.

Bribe Case
Walmik Karad: मारण्याआधी घरासमोर नैवेद्य ठेवायचा अन् दुसऱ्या दिवशी...; वाल्मीक कराडचा समर्थक 'गोट्या'चा नवा कारनामा; धक्कादायक VIDEO समोर

दोन्ही एजन्सी मिळून मागितले अडीच लाख रुपये 
तर निकम याच्या सांगण्यावरून १७ जुलै रोजी तक्रारदाराने त्यांची भेट घेतली. यावेळी तक्रारदारांच्या गॅस एजन्सीवर कारवाई न करण्यासाठी महिन्याला दीड लाख आणि नातेवाईकांच्या एजेन्सीसाठी एक लाख अशी अडीच लाख रुपयांची मागणी त्याने केली. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणातील रक्कमेची लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणी एसीबीकडे तक्रार दिली. त्यानुसार २५ जुलैला पडताळणी केली गेली. 

Bribe Case
Saibaba Silver Coin : साईबाबांच्या ९ चांदीच्या नाण्यांवरून वाद; दोन परिवारांकडून दावे प्रतिदावे, साईभक्तांमध्ये संभ्रम

पावणेदोन लाख स्वीकारताना घेतले ताब्यात 
एसीबीच्या पडताळणीत निकम यांनी तक्रारदाराकडे त्यांच्या व नातेवाईकांच्या कामासाठी आधी अडीच लाख रुपये आणि तडजोडीअंती पावणेदोन लाख रुपये घेणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, २९ जुलैला करण्यात आलेल्या कारवाईत निकम याना रंगेहात अटक करण्यात आली. एसीबीने रचलेल्या सापळ्यात निकम यांनी पावणेदोन लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याप्रकरणी एसीबी अधिक तपास करीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com