Navi Mumbai Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai : नवी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; खेडकर कुटुंबाचा चालकाला अटक, कुटुंबीय अद्याप फरार

Navi Mumbai News : पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर व सुरक्षा रक्षक यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी, डांबूम ठेवणे, मारहाण व पुरावे नष्ट करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले

Rajesh Sonwane

विकास मिरगणे
नवी मुंबई
: बोगस आयएएस अधिकारी पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर यांनी केलेल्या अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. यात खेडकर कुटुंबातील चालक प्रफुल साळुंखे याला धुळे येथून ताब्यात घेतले आहे. त्याला अटक करून नवी मुंबईला आणण्यात आले. यानंतर रात्री उशिरा बेलापूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बोगस आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर या प्रकरणात यापूर्वीच पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा खेडकर व सुरक्षा रक्षक यांच्याविरुद्ध अपहरण, खंडणी, डांबूम ठेवणे, मारहाण व पुरावे नष्ट करणे असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यानंतर नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत आता चालकाला अटक केल्यानंतर खेडकर कुटुंबातील इतर फरार सदस्यांच्या शोधाला गती मिळाली आहे.

त्या ट्रक चालकाला घरात ठेवले डांबून 

दरम्यान पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेडकर कुटुंबाच्या सांगण्यावरून चालक प्रफुल साळुंखे यानेच ट्रक चालक प्रह्लाद कुमारच्या अपहरणात मदत केली होती. प्रह्लाद कुमार (वय २२) हा ट्रक हेल्पर असून त्याला जबरदस्तीने पकडून पुण्यातील खेडकर कुटुंबाच्या घरी डांबून ठेवण्यात आले होते. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून प्रह्लाद कुमार याची सुटका केली होती. 

खेडकर कुटुंबीयांचा शोध घेण्यासाठी पथक तैनात 

दिलीप आणि मनोरमा खेडकर हे त्यांचे फोन पुण्यातील बंगल्यात ठेऊन गायब झाले आहेत. तर सध्या या प्रकरणात फक्त चालक प्रफुल्ल साळुंखे याला अटक करण्यात आली असून, खेडकर कुटुंबातील इतर आरोपी असलेले पूजा खेडकरचे वडील, आई आणि सुरक्षा रक्षक हे अद्याप फरार आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी नवी मुंबईसह पुण्यातील विविध ठिकाणी अनेक पोलिस पथके तैनात करण्यात आली आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ST Reservation: जालन्यात २४ तारखेला धनगर समाजाचा मोर्चा|VIDEO

सुवर्णनगरीत सोन्याला झळाली; एक तोळ्याची किंमत ₹१,१४,३००, दसरा-दिवळीत आणखी वाढ होणार

Maharashtra Live News Update: - पुण्यात जय भीम संघटनेच्यावतीने पडळकरांविरोधात आंदोलन

Zilha Parishad School : ग्रामपंचायतीनेच लावला गावच्या शाळेला चुना; निकृष्ट दर्जाच्या कामाने छताला गळती

BJP : ऑफिसमध्ये आढळला भाजप नगरसेवकाचा मृतदेह, गळफास घेत आयुष्य संपवलं; कारण...

SCROLL FOR NEXT