Navi Mumbai Saam tv
महाराष्ट्र

Navi Mumbai : भल्या पहाटे पोलिसांची अकरा ठिकाणी धाड; नवी मुंबईतील कारवाईत पोलिसही झाले अवाक, तीन आफ्रिकन नागरिकांना अटक

Navi Mumbai News : राज्यात राहणाऱ्या बांग्लादेशींना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येत आहे. अशातच नवी मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: नवी मुंबई पोलिसांतर्फे अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या आणि भारतात बेकायदेशीर राहणाऱ्या आफ्रिकन नागरिकांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तीन आफ्रिकन नागरिकांना ताब्यात घेत अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. नवी मुंबई पोलीसांनी पहाटे चार वाजेच्या सुमारास नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये कोंबिंग ऑपरेशनव्दारे संयुक्त कारवाई केली. 

राज्यातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या बांग्लादेशींना ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात येत आहे. अशातच नवी मुंबईमध्ये वास्तव्यास असलेल्या आफ्रिकन नागरिकांना नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेण्याची कारवाई केली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार पहाटे चार वाजता छापा टाकत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एकूण ११ ठिकाणी छापा टाकत पोलिसांनी तपासणी केली आहे. 

३५ आफ्रिकन नागरिकांची चोकशी 

पोलिसांनी टाकलेल्या छापा टाकुन ११८.४८ ग्रॅम वजनाचे कोकेन, १००.८४ ग्रॅम एमडी पावडर आणि ४३ हजार ५०० रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त अमली पदार्थाची एकूण किंमत १ कोटी १० लाख रुपये आहे. या कारवाईमध्ये एकुण ३५ आफ्रिकन नागरिकांची पडताळणी करण्यात आली असुन त्यापैकी अंमली पदार्थ बाळगणाऱ्या तीन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली. 

अकरा जणांना देश सोडून जाण्याची नोटीस 

नवी मुंबई पोलीसांकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर अंमली पदार्थ आढळून आलेल्या तीन आफ्रिकन नागरिकांविरूध्द एनडीपीएस कायदयांतर्गत उलवा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासोबतच इतर जणांची चौकशी करण्यात आली असता पासपोर्ट व विजा मुदत संपलेल्या एकुण ११ आफ्रिकन नागरिकांना भारत देश सोडुन जाण्याची नोटीस पोलिसांकडून देण्यात आली,

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT