Wardha News
Wardha NewsSaam tv

Wardha News : मोबाईलवर पाहून वेस्टेज बॉटलपासून केला गरिबांचा फ्रिज; अपंगत्वावर मात करत उभारले रोजगाराचे साधन

Wardha : पायाने काम होत नसल्याने घर कस चालवायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. अश्यातच त्यांनी मोबाईलवर वेस्टेज बॉटलला सुतळी गुंडाळून थंड पाण्याची बॉटल तयार करायची पद्धत पहिली
Published on

चेतन व्यास 

वर्धा : आजच्या आधुनिक युगात नवनवीन तंत्रज्ञान आले आहे. मात्र जुन्या पद्धतीचा वापर करून वर्धेतील दिलीप भिवगडे यांनी वेस्टेज बॉटलपासून थंड पाणी राहणारी बॉटल तयार केली आहे. मोबाईलवर पाहून वर्धेच्या दिलीप भिवगडे यांनी ही बॉटल तयार करणे शिकल आहे. ही बॉटल गरिबांच्या फ्रिजच्या नावाने विक्री होत आहे. वर्धेत सुरु असलेल्या वर्धिनी महोत्सवात ही बॉटल सध्या सर्वांच्या आकर्षणचे केंद्र बनले आहे. 

वर्ध्यातील रामनगर येथील दिलीप भिवगडे यांना पाच वर्षांपूर्वी पायाला लचका पडल्याने त्यांना चालता येत नाही. पायाने काम होत नसल्याने घर कस चालवायचं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. अश्यातच त्यांनी मोबाईलवर वेस्टेज बॉटलला सुतळी गुंडाळून थंड पाण्याची बॉटल तयार करायची पद्धत पहिली. यानंतर दिलीप यांनी ही बॉटल तयार केली. या बॉटलमध्ये पाणी भारताच काही वेळेतच पाणी फ्रिजसारख थंड गार होते. या बॉटलला गरिबांची फ्रिज म्हणून ओळख मिळाली. 

Wardha News
CCI Center : सीसीआयच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड; विदर्भातील ६८ केंद्रावर कापूस खरेदी ठप्प

बनविण्यासाठी ८० रुपयांचा खर्च 

ही बॉटल बनविताना त्यांना ८० रुपयाचा खर्च येतो आणी बॉटल दोनशे ते २२० रुपयात विकली जाते. उन्हाळ्यात या बॉटलची मोठ्या प्रमाणात विक्री होते. खाली बॉटलवर कापड किंवा सुतळीचा पोता बांधतात. त्यानंतर मोठ्या सुईच्या सहाय्याने या बॉटल एक एक आडी करत गुंडाळतात. यानंतर बॉटल चांगली दिसायला पाहिजे म्हणून त्यावर रंगीत दोरी लावतात. यामुळे बॉटल दिसायलाही चांगली दिसते. आजपासून वर्धेत सुरु झालेल्या वर्धिनी महोत्सवात या बॉटलची विक्री होत असून नागरिकही पाहवयास येत आहे.

Wardha News
Dhule Crime : बसमधून महिलेचे दागिने चोरी; महिला आरोपी मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

उभे केले रोजगाराचे साधन  
दरम्यान दिलीप भिवगडे यांना लकवा झाल्याने चालणे बंद झाले. यामुळे शेती किंवा इतर जड कामे त्यांना करता येत नव्हते. अपंगत्व आल्यावर घर कस चालवायचं या विवंचनेत ते होते. अशातच त्यांनी मोबाईलवर व्हिडीओ पाहून गरिबांची फ्रिज तयार केला आहे. यातून त्यांनी आपला एक व्यवसाय उभा केला आहे. अर्थात दिलीप भिवगडे यांची जिद्द आणी चिकाटी आजच्या युवकांनाही लाजवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com