Navi Mumbai Saam tv
महाराष्ट्र

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Navi Mumbai News : कोणाचाही धाक राहिला नसल्याने भ्रष्टाचाराला पेव सुटलाय. २०२२ साली ठाणे बेलापूर रोड वर लावण्यात आलेल्या डस्टबिन बॉक्सचे कामं पुन्हा २०२४ साली काढण्यात आले

Rajesh Sonwane

सिद्धेश म्हात्रे 
नवी मुंबई
: नवी मुंबई महानगरपालिकेत डस्टबिन घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी कंत्राटदाराला हाताशी धरून तब्बल २३ लाख रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचं उघडकीस आलेय. यामध्ये काम न करताच जुन्या कामांचे फोटो दाखवून भ्रष्टाचार करण्यात आला.

राज्यातील श्रीमंत महापालिका अशी ओळख असलेल्या नवी मुंबई महापालिकेचा (Navi Mumbai) कारभार सध्या प्रशासकाच्या हातात आहे. यामुळे कोणाचाही धाक राहिला नसल्याने भ्रष्टाचाराला पेव सुटलाय. २०२२ साली ठाणे बेलापूर रोड वर लावण्यात आलेल्या डस्टबिन बॉक्सचे कामं पुन्हा २०२४ साली काढण्यात आले. (Scam) मात्र यंदा एकही नवी डस्टबिन बॉक्स न बसविता २०२२ साली बसविण्यात आलेल्या जुन्या डस्टबिन बॉक्सच्या फोटोवरील तारीख काढून तेच फोटो २०२४ सालचे असल्याचे दाखवून तब्बल २३ लाख रुपयांचे बिल मंजूर करुन पैसे हडप करण्यात आलेत. 

ज्या ठेकेदाराने २०२२ साली डस्टबिन बॉक्स बसविण्याचे कामं केले; त्याच ठेकेदाराने हा भ्रष्टाचार उघडकीस आणला. मनपा अधिकाऱ्यांनी ठेकेदाराशी संगनमत करुन हा डस्टबिन घोटाळा केला आहे. काम न करताच जनतेच्या पैशाची लुबाडणूक केली आहे. स्वच्छ सर्वेक्षणाच्या नावाखाली असे अनेक भ्रष्टाचार मनपा क्षेत्रात सुरु असून कामं न करताच ठेकेदारांना हाताशी धरून मोठ्या प्रमाणात जनतेच्या पैशाची लूट करण्यात येत आहे. या घोटाळ्यात सहभागी असलेल्या मनपा अधिकाऱ्यांना निलंबित करुन या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय भवारी यांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT