मोंढा (परभणी) : परभणी शहरातील वसतीगृहात वास्तव्यास असलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. तसेच येथीलच तीन मुलींचा विनयभंग करण्यात आल्याची घटना परभणी शहरातील सत्कार कॉलनी येथे समोर आली आहे. या प्रकरणी नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
परभणी (Parbhani) शहरातील वसमत रोडवरील सत्कार कॉलनी येथे एक निवासी वस्तीगृह आहे. या वसतीगृहात राहत असलेल्या १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. तसेच इतर तीन अल्पवयीन मुलींचा विनयभंग सुद्धा करण्यात आला आहे. घडल्या प्रकाराबाबत मुलींनी घरी (Crime News) माहिती दिली. यानंतर पालकांनी वसतिगृहात येत विनयभंग करणाऱ्याला पकडले. तसेच याबाबत नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संशयितास दिला चोप
सदर घटना विद्यार्थिनीने तिच्या नातेवाईकांना कळली असता घटनेतील संशयित आरोपी विकास मुरलीधर कदम (वय ३१) ह्या वसतिगृह चालकास चोप देत नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. या घटनेने एकच खळबळ उडाली असून निवासी शाळेतील विद्यार्थीनीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.