Navi Mumbai Saam Tv News
महाराष्ट्र

Navi Mumbai: नवीन वर्षाचं खास गिफ्ट! नवी मुंबई विमानतळावर उतरलं पहिलं विमान, व्हिडिओ आला समोर

Navi Mumbai International Airport: नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, आज २९ डिसेंबरला पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी रित्या लँडिंग झाले आहे.

Bhagyashree Kamble

नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात असून, आज २९ डिसेंबरला पहिल्या व्यावसायिक विमानाचे यशस्वी रित्या लँडिंग झाले आहे. काही दिवसांपूर्वी नवी मुंबई विमानतळावर वायुदलाचे सी २९५ आणि सुखोई ३० या विमानाच्या यशस्वी लँडिंग झाले होते. त्यानंतर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या रनवे वर इंडिगो एअरलाईनसचे व्यवसायिक विमानाची लँडिंग यशस्वी रित्या झाली आहे.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहिल्या व्यवसायिक विमानाचे यशस्वी लँडिंग झाले आहे. इंडिगो A320 या विमानानं मुंबई विमानतळ येथून टेक ऑफ केल्यानंतर थेट नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वी रित्या लँडिंग केली आहे. यशस्वी लँडिंग झाल्यानंतर विमानाला वॉटर कॅनलची सलामी देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम ३१ मार्च २०२५ पर्यंत पूर्ण होईल. नंतर हे विमानतळ कार्यन्वित होणार आहे. या विमानातून एका वर्षाला ९ कोटीहून अधिक प्रवासी प्रवास करतील अशी माहिती असून, विमानतळाच्या टर्मिनल इमारतीचे काम अंतिम टप्प्यात आहे. सुमारे ५९४५ एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आलं आहे. या विमानतळाचे रनवे ३.७ किमी इतका असून, या विमानतळावर एकाचवेळी ३५० विमानं उभी राहू शकतात.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. विमानतळाचा रनवे, सिग्नल यंत्रणा, अशी सर्व महत्त्वाची कामे जवळपास पूर्ण झाल्याची माहिती आहे. त्यानंतर पहिले विमान उड्डाण करेल, अशी माहिती सिडकोच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलीय.

महिन्याभरापूर्वीच लष्कराच्या विमानाचे यशस्वी लँडिंग टेस्ट करण्यात आले होते. त्यामुळे आज थेट व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात आलं आहे. यावेळी सिडको आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड कंपनीचे अधिकारी व्यवसायिक विमानात उपस्थित होते. विमानाचे यशस्वी रित्या लँडिंग झाल्यानंतर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT