Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : परदेशात नोकरीच्या खोट्या प्रलोभनाचा पर्दाफाश; मनसेच्या हस्तक्षेपाने दोन तरुणांची सुटका

Navi Mumbai News : पाच जणांना परदेशात नोकरी देण्याचे सांगत थायलंडला पाठविण्यात आले याठिकाणी अडकलेल्या उर्वरित तीन तरुण पंधरा दिवसात भारतात पाठवले नाही तर अँग्री सरदार ब्रँड अंधेरी मुंबईत दिसणार नसल्याचा इशारा मनसेने दिला

Rajesh Sonwane

संजय गडदे
मुंबई
: परदेशात मोठ्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गंडविण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात पाच जणांना थायलंडला पाठवण्यात आले. मात्र बँकॉकमध्ये पोहोचल्यावर या तरुणांना हॉटेलमध्ये चांगली नोकरी देण्याचे आलेले आश्वासन फोल ठरले आणि त्यांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. 

नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करण्याचे प्रकार अनेदा समोर आले आहेत. ओळखीतून चांगली नोकरी मिळवून देणे किंवा परदेशात चांगली नोकरी देण्याचे नाव सांगत फसवणूक करण्यात येत असते. असाच प्रकार नवी मुंबईत समोर आला. विशेष म्हणजे संबंधित व्यक्तीने पाच जणांना नोकरी देण्याचे सांगत थायलंडला पाठविण्यात आले होते. मात्र त्याठिकाणी या पाचही जणांना कोठेही नोकरी देण्यात आलेली नव्हती. 

दोन जणांची सुटका 
दरम्यान या पीडितांपैकी एक नवी मुंबईतील व एक गोरेगाव राम मंदिर परिसरातील होता. या दोघांनी फोनवरून मनसेकडे घडल्या प्रकारची माहिती दिली. तक्रारीची गंभीर दखल घेत मनसे वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाई यांनी ओशिवरा येथील संबंधित हॉटेलला भेट देऊन व्यवस्थापनाला समज दिली. मनसेच्या या हस्तक्षेपानंतर थायलंडमध्ये अडकलेल्या दोन तरुणांची सुटका करण्यात यश आले आहे. 

कंपनीला मनसेचा इशारा 

दरम्यान थायलंडला गेलेल्या पाच तरुणांपैकी दोन जणांची सुटका करण्यात यश मिळाले असून अजूनही तीन तरुण परदेशात अडकलेले आहेत. ते तरुण पुढील १५ दिवसांत भारतात परतले नाहीत; तर अंधेरीतील अँग्री सरदार या ब्रँडविरोधात कारवाई केली जाईल, असा इशारा मनसे विभागाध्यक्ष संदेश देसाई यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नुकसानग्रस्तांसाठी मोठी घोषणा; फडणवीस सरकारकडून शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांना फी माफी, कुठल्या विद्यार्थ्यांना मिळणार लाभ?

Maharashtra Live News Update : ४५ लाख शेतकऱ्यांना विमा उतरवला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Cough Syrup : कफ सिरपमुळं नागपुरात दाखल झालेल्या १३ मुलांचा मृत्यू; आरोग्य यंत्रणा खळबळून जागे

Naga Chaitanya : समंथासोबतच्या घटस्फोटानंतर नागा चैतन्य अन् शोभिता धुलिपालाची लव्हस्टोरी कशी फुलली?

Aadhaar Card Update: आता नाही द्यावे लागणार ₹१२५, मोफत होणार आधार अपडेट, UIDAI चा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT