Vidarbha Nautapa
Vidarbha Nautapa saam tv
महाराष्ट्र

Vidarbha Nautapa: सावधान! विदर्भात आजपासून नवतपा; पारा ४६ अंशांवर जाण्याची शक्यता

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News: विदर्भात आजपासून नवतपाची सुरुवात झाली आहे. या काळात तापमानाची सर्वोच्च नोंद होते. विदर्भ व मध्य भारतात उन्हाळ्यात नवतपाला विशेष महत्त्व आहे. या नऊ दिवसांत तापमान सर्वाधिक असते, अशी धारणा आहे. या नऊ दिवसात विदर्भातील तापमान ४६ अंशाच्या पार जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आवश्यकता नसेल तर दुपारी उन्हात जाणे टाळण्याचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला आहे. (Latest Marathi News)

उन्हाच्या (Heat Stroke) तडाख्यामुळे नागरिक हैराण झाले असतानाच पुढील 9 दिवस तापमानाचा पारा आणखी वाढण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे, सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत घराबाहेर पडू नये असं आवाहन हवामान खात्यानं केलं आहे.

फिरतीचं काम असणाऱ्यांनी सतत पाणी पिणं आवश्यक आहे. तसंच लिंबूपाणी, फळांचे ज्यूस पिणंही गरजेचं आहे. कारण उकाडा जाणवल्यावर आपलं शरीर हे पाणी आणि क्षार बाहेर फेकून स्वतःला थंड ठेवत असतं. मात्र पाणी वेळेत प्यायलं नाही तर हीट स्ट्रोकचा धोका असतो. (Nagpur News)

एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसामुळं तापमान गाठलं होतं. मात्र, आता मे महिन्यात सूर्य आग ओकतोय. त्यातच आता विदर्भात आजपासून नवतपाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे विदर्भवासियांना ९ दिवस उन्हाचे चटके सहन करावे लागणार आहेत. विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यामध्ये तापमानाने चाळीशीचा पार गाठला आहे. त्यामुळं विदर्भात उष्णेतेची लाट येण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar Health: शरद पवारांच्या प्रकृतीसंदर्भात मोठी अपडेट; आमदार रोहित पवारांनी दिली महत्वाची माहिती

MS Dhoni Record: वयाच्या ४२ व्या वर्षी धोनीचा मोठा कारनामा! IPL मध्ये असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच यष्टीरक्षक

Amravati News : शिवपुराण कथेच्या कलश यात्रेदरम्यान महिलेचा मृत्यू

Marathi Vs Gujarati News | गुजराती बहुल सोसायटीत मराठी माणसांना बंदी, ठाकरे गटाचा आरोप

Hair Care Tips: केसांचा Freezyness घालवण्यासाठी 'या' सेप्या टीप्स करा फॉलो

SCROLL FOR NEXT