ncp strike against Maharashtra government  saam tv
महाराष्ट्र

Tata Airbus Project: सरकारविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार, गाजर दाखवून निषेध आंदोलन, फडणवीसांच्या घरी सुरक्षा वाढवली

टाटा एअरबस प्रकप्ल गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

मुंबई : वेदांता फॉक्सकॉन पाठोपाठ टाटा एअरबस प्रकप्ल गुजरातला गेल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरलं आहे. सत्ताधारी विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरु आहे. राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. या परिस्थितीला राज्य सरकारच जबाबदार आहे, असा सूर विरोधकांकडून आवळला जात आहे. दरम्यान, आज वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकार विरोधात (NCP) राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.

तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis) यांच्या घराजवळही आंदोलन करण्यात आल्याने राजकीय वातावरण पेटलं आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांच्या घरातील पोलीस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. (Nationalist yuvak congress strike against Maharashtra government)

राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प (Tata airbus project) गुजरातला जात असून राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.'उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला' अशी घोषणा देत यावेळी काळ्या रंगाचे विमान उडवत आणि गाजर दाखवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं.

'गुजरात तुपाशी आणि महाराष्ट्र उपाशी' अशी अवस्था या मिंदे सरकारने करून ठेवली असून महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला घेऊन जात आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार पळवण्याचा प्रयत्न मिंदे सरकार करत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घराजवळ सुरक्षा वाढवली

राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसकडून फडणवीस यांच्या घराजवळ जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे फडणवीसांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे. टाटा समुहाचा प्रकल्प गुजरातला गेल्याच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. फडणवीस यांच्या नागपूरातील घराजवळ आंदोलन करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर फडणवीस यांच्या घराची सुरक्षा वाढवण्यात आलीय.

ट्राफीक पार्क ते फडणवीस यांच्या घरांपर्यंत राष्ट्रवादीचं आंदोलन आहे. शिंदे सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून बॅरिकेटिंग करून आंदोलकांना पोलिसांकडून रोखले जात आहे. आंदोलनाला परवानगी नसल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आहे.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

Ladki Bahin Yojana : 'लाडकी'मुळे अर्थव्यवस्थेला खड्ड्यात? अर्धा कोटी लाडक्या बहिणींचा लाभ बंद?

Divya Deshmukh: 64 घरांची राणी वर्ल्डकप विजेत्या दिव्या देशमुखबद्दलच्या 'या' 10 गोष्टी जाणून घ्या

Raigad : डिश रिपेअरिंगसाठी घरात घुसले, सोन्याचे दागिन्यांकडे मन वळलं, नंतर अल्पवयीन तरुणांचं वृद्ध महिलेसोबत धक्कादायक कृत्य

SCROLL FOR NEXT