sunetra pawar  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून निसटल्या? मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प

sunetra pawar News : राज्यात सत्तेमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि अर्थ खातं यांचं अतूट नाते राहिलंय. 1999 पासून राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे वित्त विभागाची धुरा होती. 27 वर्षांत 22 वर्षे अर्थखातं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे होतं. मात्र आता अजित पवारांच्या निधनामुळे तिजोरीच्या चाव्या राष्ट्रवादीकडून निसटल्या आहेत.पाहूया एक रिपोर्ट

Girish Nikam

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी शनिवारी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्याकडे उत्पादन शुल्क, क्रीडा आणि अल्पसंख्याक ही तीन खाती देण्यात आली. मात्र अजित पवारांकडे असलेले महत्वाचे अर्थखाते त्यांना देण्यात आलं नाही. राष्ट्रवादी सत्तेत आहे पण या पक्षाकडे वित्त खाते नाही अशी वेळ पहिल्यांदाच आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे वित्तखाते न दिल्यामुळे राज्याचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडण्याची शक्यता आहे. अजितदादांनी अर्थसंकल्पाची बरीच तयारी केली होती. यापुढे मी स्वत: लक्ष घालून पुढची प्रोसेस करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली तेव्हा वित्त खाते आमच्याकडेच ठेवा. ते होणार नसेल तर महत्त्वाची अन्य दोन खाती आमच्या पक्षाला द्या असे साकडे घातले होते, अशी सुत्रांची माहिती आहे.

सत्तेमध्ये राष्ट्रवादी आणि वित्त विभाग यांचे अतूट नाते राहिले. १९९९ मध्ये काँग्रेससोबत आघाडी सरकार आले तेव्हा राष्ट्रवादीचे जयंत पाटील वित्त मंत्री झाले. सलग १० वेळा त्यांनी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यानंतर याच पक्षाचे दिलीप वळसे पाटील, सुनील तटकरे, अजित पवार असे २०१४ पर्यंत काँग्रेससोबत सत्ता असताना वित्त मंत्री राहिले. २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे तीन पक्षांचे सरकार आले तेव्हाही अजित पवार यांच्या रुपाने वित्त खाते राष्ट्रवादीकडेच राहिले होते.

२०२२ मध्ये शिंदेसेना-भाजपचे सरकार आले आणि वित्त खाते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले. ९ मार्च २०२३ रोजी त्यांनी अर्थसंकल्प मांडला. जुलै २०२३ मध्ये अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि त्यांना वित्त खाते मिळाले. २८ जून २०२४ रोजी त्यांनी अंतरिम अर्थसंकल्प मांडला आणि १० मार्च २०२५ रोजी अर्थसंकल्प मांडला होता.

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २० दिवसांवर असल्याने तूर्तास वित्त खाते हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वतःच सांभाळावे असा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून आलेला होता. आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चेत समन्वयाने तसे ठरल्याची माहिती आहे. दुसरीकडे प्रशासनावर पकड असलेला पक्ष म्हणून राष्ट्रवादीची ओळख आहे. मात्र अर्थखातं नसल्यानं राष्ट्रवादीची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याचं बोललं जात आहे.

अर्थसंकल्प मांडणारा नेता आकर्षक योजनांची घोषणा करतो. मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडला की लोकप्रिय घोषणांचे श्रेय भाजपकडे जाणार आहे. एकूणच अजित पवारांच्या निधनाने महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस बॅकफूटवर आली आहे. त्यात अर्थखात्याच्या चाव्या भाजपच्या कमरेला गेल्यानं राष्ट्रवादीला त्याचा फटका बसणार का हा प्रश्न आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फडणवीस सरकारची तात्काळ मदत

AIमुळे बँकांमध्ये नोकर कपात? जगावर बेरोजगारीचं सावट

हिंदू तरूणीचे अपहरण, ५ दिवस घरात डांबून ठेवले; 'लव्ह जिहाद'ने अकोला हादरले

LPG Latest Updates: गॅस टंचाईदरम्यान LPG, CNG आणि PNG बाबत सरकारचा मोठा निर्णय

Jowar Chakli Sticks: झणझणीत ज्वारी स्टिक्स रेसिपी, घरच्या घरी करा हेल्दी स्नॅक्स

SCROLL FOR NEXT