nandurbar, national highway, bridge collapsed , dhonara village
nandurbar, national highway, bridge collapsed , dhonara village saam tv
महाराष्ट्र

National Highway 6 : पूल कोसळला, गुजरातला जाणारी वाहतूक 'या' मार्गानं सुरु

दिनू गावित

National Highway 6 : राज्य महामार्ग क्रमांक सहा वरील धानोरा आणि ईसाईनगर गावाजवळील रंका नदीवरील पूल (bridge) आज सकाळी कोसळला. यामुळे या भागातून गुजरातला (gujarat) जाणारी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं (pwd) त्याबाबतची माहिती कळवली आहे. (Maharashtra News)

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ता पाळधी-अमळनेर-शिंदखेडा-दोडांईचा-नंदुरबार-धानोरा ते गुजरात राज्य हद्द हा राज्यमार्ग क्रमांक सहावरील (165/650 मधील) धानोरा गावाजवळील मोठा पुल आज सकाळी साडे नऊ वाजता कोसळला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पुर्णत: बंद करण्यात आली आहे. (Nandurbar Latest Marathi News)

या मार्गावरुन नवापूरकडे जाणारी अवजड वाहतुक करणखेडा गावाजवळून धुळवद गावाकडे (रामा-11) वरुन वळविण्यात आली आहे. गुजरातकडे जाणारी वाहतुक धानोराकडून नटावद-आर्डीतारा (प्रजिमा-49) मार्गे तर इतर लहान वाहनांसाठी वाहतुक धानोरा गावातून पर्यायी पुलावरुन वळविण्यात आली आहे.

रंका नदीवर करण्यात आलेल्या पुलाचे बांधकाम स्तंभ हे दगडी बांधकामाचे होते. त्यावर आरसीसी स्लॅबचे बांधकाम करण्यात आले होते. दगडी बांधकामातील स्तंभ कोसळल्याने सदर पुल क्षतिग्रस्त झाल्याचे प्रथमदर्शनी आढळुन आले आहे. असे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rupali Chakankar: EVM ची केली पूजा, रुपाली चाकणकरांवर गुन्हा दाखल

Live Breaking News : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सायंकाळी ५ पर्यंत ५३.४० टक्के मतदान

'Met Gala 2024' मधील Alia Bhatta चं सौंदर्यापाहून अप्सरा आणि मस्तानीही ठरतील फेल

Shweta Tiwari: सुपरबोल्ड श्वेता तिवारी; हॉट अदांनी उडवली झोप!

DC vs RR,IPL 2024: सामन्याआधीच राजस्थानचं टेन्शन वाढलं! दिल्लीच्या या स्टार खेळाडूंचं होणार कमबॅक, पाहा प्लेइंग ११

SCROLL FOR NEXT