Mamata Banerjee National Anthem News
Mamata Banerjee National Anthem News saam tv
महाराष्ट्र

National Anthem Case: राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणी ममता बॅनर्जी यांना मोठा धक्का! मुंबई हायकोर्टाने फेटाळली याचिका

Chandrakant Jagtap

Mamata Banerjee National Anthem Contempt Case: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी मुंबई हायकोर्टाने मोठा झटका दिला आहे. ममता बॅनर्जी यांनी मुंबई सत्र न्यायालयानं दिलेल्या निकालाला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केली होती. ही याचिका हायकोर्टाने फेटाळाली आहे.

राष्ट्रगीताचा अवमान प्रकरणात ममता बॅनर्जी यांना कोणताही दिलासा देण्यास हायकोर्टाना नकार दिला आहे. त्यामुळे आता शिवडी सत्र न्यायालयात सुरू असलेल्या कायदेशीर कारवाईला ममता बॅनर्जी यांना सामोरे जावे लागणार आहे.

ममता बॅनर्जींची याचिकेत काय होती?

या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याची विनंती करणाऱ्या अर्जावर याचिकेवर ममता बॅनर्जी यांनी फेरविचार करण्याचे आव्हान उच्च न्यायालयात दिले होते. विशेष न्यायालयाने समन्स एकदाच रद्द करायला हवे होते आणि हे प्रकरण न्यायदंडाधिकाऱ्यांकडे परत पाठवायला नको होते, असे ममता बॅनर्जी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते. मात्र उच्च न्यायालयाने त्यांना याप्रकरणी कोणताही दिलासा न देता त्यांची याचिका फेटाळून लावली.

काय आहे प्रकरण?

भाजपचे स्थानिक पदाधिकारी विवेकानंद गुप्ता यांच्या तक्रारीवरून मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टाने मार्च 2022 मध्ये ममता बॅनर्जी यांना समन्स बजावले होते. गुप्ता यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, डिसेंबर 2021 मध्ये यशवंतराव चव्हाण सभागृहात एका कार्यक्रमादरम्यान बॅनर्जी राष्ट्रगीत वाजत असतानाही बसून राहिल्या आणि नंतर अचानक मध्यभागी उभे राहिल्या आणि दोन ओळी गाऊन अचानक गप्प बसल्या. तसेच त्यानंतर त्या तिथून निघून गेल्या, असा दावा गुप्ता यांनी केला आहे.

राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा गुप्ता यांचा दावा

विवेकानंद गुप्ता यांनी त्यांच्या तक्रारीत असे देखील म्हटले आहे की, ममता बॅनर्जी यांचे हे पाऊल राष्ट्रगीताचा अवमान आणि अनादर करणारे आहे आणि ते राष्ट्रीय सन्मान अधिनियम 1971 अंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीत येते. याबाबत गुप्ता यांनी यापूर्वी कफ परेड पोलिस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र कोणतीही कारवाई न झाल्याने त्यांनी दंडाधिकाऱ्यांकडे दाद मागितली. (Latest Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : १७ लाख कुटुंबांनी भारतीय नागरिकत्व सोडलं; प्रकाश आंबेडकरांचा भाजपवर हल्लाबोल

IPL 2024 LSG vs KKR: सुनिल नारायणच्या फटकेबाजीने LSG च्या गोलंदाजांना दाखवलं 'आस्मान'; लखनऊसमोर २३६ धावांचे आव्हान

Sharad Pawar News: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द; प्रकृतीमुळे घेतला निर्णय

IPL 2024 : जडेजाच्या ऑलराउंडर खेळीने पंजाबचं प्लेऑफचं स्वप्न भंगलं; Points Table मध्ये CSKची टॉप-३ मध्ये एंट्री

Prajwal Revanna: प्रज्वल रेवन्नाविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी, जाणून घ्या काय आहे या नोटीसचा अर्थ

SCROLL FOR NEXT