Paithani Saam Tv
महाराष्ट्र

Paithani: आता पैठणीवर राजा रविवर्मा यांची जगप्रसिद्ध पेंटिंग्ज, येवल्यातील विणकराने साकारली आगळी-वेगळी पैठणी

पैठणी या महावस्त्राच्या जरतारी पदरावर नाचऱ्या मोरासोबतच आता चक्क राजा रविवर्मा यांची जगप्रसिद्ध पेंटिंग्जही दिसणार आहेत.

अभिजीत सोनावणे, सामटीव्ही नाशिक

नाशिक : पैठणी या महावस्त्राच्या जरतारी पदरावर नाचऱ्या मोरासोबतच आता चक्क राजा रविवर्मा यांची जगप्रसिद्ध पेंटिंग्जही दिसणार आहेत. तब्बल अडीच महिने अथक परिश्रम घेऊन येवल्यातील विणकरानं ही आगळी-वेगळी पैठणी साकारलीय. गेल्या काही दिवसांपासून मोरासोबतचं सिंह, वाघ, हरीण, निसर्ग, जंगल अशा वेगवेगळ्या कलाकृतीही पैठणीच्या महावस्त्रावर पाहायला मिळत असून बदलत्या काळानुसार आता येवल्यातील प्रसिद्ध पैठणीचा ट्रेंडही बदलू लागलाय (Nashik world famous paintings of Raja Ravivarma on Paithani).

समस्त महिला वर्गाचं महावस्त्र म्हणजे पैठणी (Paithani). प्रत्येक महिलेला हवी हवीशी वाटणाऱ्या पैठणीच्या पारंपरिक ट्रेंडमध्ये आता काळानुसार बदल होताना पाहायला मिळतोय. पारंपारिक पैठणीबरोबरच आता पैठणीच्या जरतारी पदरावर राजा रविवर्मा (Raja Ravi Varma) यांनी शकुंतला या जगप्रसिद्ध पेंटिंगला स्थान देण्यात आलंय. राजा रविवर्मा यांनी शकुंतला नामक एका महिलेचं पेंटिंग काढलं होतं. हे पेंटिंग (Painting) नंतर जगप्रसिद्ध झालं.

येवल्यातील (Yeola) पैठणी विणकर चेतन धसे यांनी तब्बल अडीच महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर ही जगप्रसिद्ध पेंटिंग पैठणीच्या जर तारी पदरावर उतरवलीये. या पैठणीची किंमत तब्बल दीड लाखांच्या घरात आहे.

पैठणीचा ट्रेंड बदलू लागलाय

पैठणीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिक (Nashik) जिल्ह्यातील येवल्यामध्ये गेल्या कैक वर्षांपासून अगदी घराघरात हातमागावर पैठणी विणली जाते. पैठणीवरची नाजूकशी बुट्टी, कमळाची फुलं, पदरावर जर तारीचा नाचरा मोर आणि आकर्षक रंगसंगती अशी पारंपारिक पैठणी महिलांच्या जिव्हाळ्याचा विषय. मात्र बदलत्या काळानुसार आता पैठणीचा ट्रेंड बदलू लागलाय. गेल्या काही दिवसांपासून येवल्यातील प्रसिद्ध पैठणीत आपल्याला नवा ट्रेंड पाहायला मिळतोय.

पारंपरिक पैठणीच्या जरतारी पदरावरची मोराची जागा आता पक्षी, प्राणी, निसर्ग, जंगल, पक्ष्यांचे घरटे अशा देखाव्यांनी घेतली असून आता त्यात राजा रवी वर्मा यांच्या पेंटिंगचीही भर पडलीये. पारंपरिक पैठणी विणायला कमी कालावधी लागत असला, तरी या नव्या ट्रेंडच्या पैठणी विणायला 5 ते 6 महिन्यांचा कालावधी लागतो. सध्या ग्राहकांच्या आवडी आणि मागणीनुसार या नव्या स्वरूपातल्या पैठणी येवल्यात तयार केल्या जात असून त्यांच्या किंमतीही अगदी लाखांच्या घरात आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT