Nashik Marriage Latest News, Nashik Marriage News Today, Nashik Latest News Updates Saam Tv
महाराष्ट्र

रुसलेल्या नवरदेवाची सासऱ्याकडे अनोखी मागणी; तालुक्यात चर्चेला उधाण

आगळ्या- वेगळ्या नवरदेवाच्या मागणीमुळे सर्वांची चांगलीच धांदल उडाली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नाशिक: नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील एका विवाह (Marriage) सोहळ्यात रुसलेल्या नवरदेवाने सासऱ्याकडे चक्क रस्त्याची मागणी करून सर्वाची धांदल उडवली आहे. लग्न कार्यामध्ये नवरदेव रुसणे, रुसलेल्या नवरदेवाचा हट्ट सासर्‍याने पुरवणे हे पाहतो अनुभवत असतो. सोन्याची (gold) वस्तू किंवा गाडी यासारख्या मागण्या नवरदेवाकडून होत असतात आणि सासरच्या मंडळीकडून त्या पूर्ण देखील केल्या जात असतात. (Nashik Marriage News Today)

मात्र, रस्त्याच्या आगळ्या- वेगळ्या मागणीमुळे सर्वांची चांगलीच धांदल उडाली आहे. बोलठाणचे प्रगतशील शेतकरी (Farmers) सतीश रिंढे यांची कन्या ऋतुजा हीचा विवाहसोहळा गंगापूर तालुक्यातील गोपाळवाडीचे जयेश यांच्या बरोबर संपन्न झाला. नवरदेव आणि त्यांच्याबरोबर येणाऱ्या वऱ्हाडी मंडळीला बोलठाणला पोहोचण्यासाठी मनेगाव फाटा ते धरण या 3 किलोमीटर खड्डेमय रस्त्यावरून (road) प्रवासासाठी १ तास लागल्याने आणि त्यामुळे झालेल्या मानसिक त्रासामुळे सर्वच मेटाकुटीला आले होते.

हे देखील पहा-

विवाह प्रसंगांमध्ये पायघड्या टाकण्यात आल्यानंतर नवरदेव रुसतो आणि त्यानंतर त्याचा रुसवा दूर करण्यासाठी सासू- सासरे त्याची मागणी पूर्ण करत असतात. मात्र, या नवरदेवाने मला काही नको आपण फक्त मनेगाव फाटाचा रस्ता चांगला करा, अशी मागणी करून सर्वांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नाला हात घातला आहे. आत्तापर्यंत कधीच अशी मागणी झालेली नसल्याने ही मागणी सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. मनेगाव फाटा हा रस्ता नाशिक आणि औरंगाबाद जिल्हा जोडणारा मुख्य रस्ता असून आरोग्य सेवा, शिक्षण सेवा, सरकारी कामे, यासाठी प्रामुख्याने वापरला जातो. रस्त्यावरून प्रवास करतांना होणाऱ्या मरणासन्न यातना या सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, लोकप्रतिनिधी यांना दिसत नाही.

हे मात्र नवलच आहे. रस्ता हा त्या विभागाच्या गावाच्या विकासाचा महत्वाचा घटक असतो. परंतु, आधुनिक काळात आपली मुलगी ज्या ठिकाणी विवाह करून नांदण्यासाठी जाणार आहे. त्याठिकाणचे रस्ते ही पाहिले जातात. या रस्त्याची झालेली दुरवस्था पाहता, यामुळे अनेक विवाह मोडले तर अनेक विवाह खोळंबल्याचीही उदाहरणं आहेत. दरम्यान नवरदेवाच्या या मागणीवर वधूपित्याने आम्ही आमदार खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून, रस्त्याचा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिल्यानंतर नवरदेवाचा रुसवा काढण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT