वृत्तसंस्था: देशात कमी झालेली कोरोना रुग्णांची संख्या हळूहळू वाढत असल्याचे चित्र आता बघायला मिळत आहे. गेल्या २४ तासात देशात २ हजार ३८० नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. काल देशात २ हजार ६७ कोरोना (Corona) रुग्णांची नोंद झाली होती, तर ४० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज या रुग्णसंख्येत (patient) थोडी वाढ झाली आहे. (Corona Latest News Updates)
हे देखील पहा-
दरम्यान, देशामध्ये आत्तापर्यंत ४ कोटी ३० लाख ४९ हजार ९७४ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर आत्तापर्यंत कोरोनामुळे (Corona) ५ लाख २२ हजार ०६२ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या १३ हजार ४३३ आहे. गेल्या २४ तासांत १,०९३ सक्रिय रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर ९८.७६ टक्के आहे.
महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोनाच्या रुग्णसंख्येत चढ उतार होताना सध्या दिसून येत आहे. बुधवारी राज्यामध्ये १६२ रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात ॲक्टिव्ह रुग्णसंख्या देखील १ हजारांखाली आली आहे. राज्यामध्ये सध्या ६९० अॅक्टिव्ह रुग्ण आहे. तसेच गेल्या २४ तासात एकही कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला नाही. राज्यामध्ये गेल्या २४ तासात १३२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. राज्यामध्ये काल कोरोनामुळे एकही मृत्यूची नोंद झाली नाही. राज्याचा मृत्यूदर हा १.८७ टक्के झाला आहे.
राज्यामध्ये आतापर्यंत ७७,२७, ६८३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.११ टक्के झाले आहे. राज्यात आजपर्यंत ७, ९९, १३, ६३२ प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे. सध्या राज्यात ६९० अॅक्टिव्ह रुग्ण आहे. यामध्ये राज्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण मुंबईमध्ये आहेत. मुंबईत ४१५ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. त्या खालोखाल अॅक्टिव्ह रुग्ण ठाण्यात आहे. ठाण्यात ५३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
Edited By- Digambar Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.