केंद्र सरकारनं देशच उद्योगपतींना विकलेला आहे- संजय राऊत

यशवंत जाधवांच्या मालमत्तेवरून सेनेवर टीका करणाऱ्यांना उत्तर
Sanjay Raut Latest News Updates, Sanjay Raut News Today
Sanjay Raut Latest News Updates, Sanjay Raut News TodaySaam Tv
Published On

मुंबई: शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केंद्र सरकार बरोबरच भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ते पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले आहे की, केंद्र सरकारने (Central Government) अनेक सार्वजनिक उपक्रम विकले आहेत. अख्खा देश त्यांनी विकला आहे. आपल्या मर्जीतील उद्योगपतींना (industrialists). ते विकून जर तुमचे पोट भरले नसेल तर अजून काय विकायचे राहिले आहे का? ही देशाची संपत्ती आपण विकली आहे. (Sanjay Raut Latest News Updates)

हे देखील पहा-

शेतकऱ्यांना (farmers) द्यायला पैसे नाहीत. तुम्ही गरीबांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार होते. तुम्ही अनेक योजना घोषित केले होते. त्यासाठी तुम्ही देश विकला, असा गंभीर आरोप संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केला आहे. यशवंत जाधवांची संपत्ती विकून शेतकऱ्यांना पैसे द्या अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) काल केली होती. यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांचा मुद्दा संपूर्ण देशभर आहे.

७ वर्षामध्ये केंद्र सरकारने देश विकला आहे. एअर इंडिया राहिली होती, ती देखील विकली. आता देशात विकण्यासारखे काही राहिलेच नाही. राऊत म्हणाले पुढे म्हणाले की, २०२४ ची तयारी आतापासून सुरु केली आहे. आदित्य ठाकरे यांच्याबरोबर आम्ही नागपूर दौऱ्यावर जाणार आहोत. नागपुरात शिवसेना वाढवणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत. आयएनएस विक्रांत हे प्रकरण वाटतं तितके सोपे नाही. आयएनएस विक्रांतच्या पै न पैचा हिशोब घेतला जाणार आहे. कितीही कुणी बाहेर येऊन बडबड केली तरी फरक पडणार नाही.

Sanjay Raut Latest News Updates, Sanjay Raut News Today
कौटुंबिक वादातून जावयाकडून सासऱ्‍याचा खून

या विषयी लवकरच पोलिस कारवाई करणार आहेत. माझा हा हवेतील गोळीबार नाही, आम्ही पुराव्यासह बोलत आहोत. राजभवनातून आलेले पत्र सर्वात मोठा पुरावा आहे. जर पैसे राजभवनात गेले नाहीत तर कुठे गेले. याचा हिशोब अंतरिम जामिनावर सुटलेल्या आरोपींना द्यावा लागणार आहे. हा घोटाळा साधा नाही. लाखो लोकांकडून पैसे गोळा केले आहेत. ५८ कोटींचा हा घोटाळा आहे. हा आकडा कुठुन आणला हे पोलिस लवकरच सांगतील, असे संजय राऊत यावेळी म्हणाले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com