Nashik News Saam tv
महाराष्ट्र

Leopard Rescue : दबक्या पावलाने आला अन् अडकला, कोंबड्यावर ताव मारायला आलेला बिबट्याला केलं जेरबंद, पाहा Video

Nashik News : नाशिकमध्ये पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याने शिरकाव करून कोंबड्यांवर ताव मारला. मात्र शिकारीसाठी गेलेल्या बिबट्या स्वतःच अडकून पडला. वनविभागाने थरारक रेस्क्यू करून बिबट्याला जेरबंद केले.

Alisha Khedekar

  • त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीचीवाडी गावात बिबट्या पोल्ट्री फार्ममध्ये शिरला

  • तीन ते चार कोंबड्यांवर हल्ला करून बिबट्या आतच अडकला

  • वनविभागाने थरारक रेस्क्यू करून भूलीचं इंजेक्शन दिलं

  • या घटनेमुळे परिसरात भीतीचं सावट

मानवाने मोठ्या प्रमाणावर केलेल्या जंगल तोडीमुळे जंगलातले प्राणी खाण्याच्या शोधात मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना काही नवीन नाहीत. मात्अशीच एक धडकी भरवणारी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीचीवाडी गावात मंगळवारी सकाळी शिकारीच्या उद्देशाने गावातील पोल्ट्री फार्ममध्ये बिबट्याने शिरकाव केला आणि कोंबड्यांवर ताव मारला.

मिळालेल्या माहितीनुसार,नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोरीचीवाडी गावात मंगळवारी सकाळी शिकारीच्या शोधात असलेल्या बिबट्याने थेट पोल्ट्री फार्ममध्ये उडी मारली. पोल्ट्री फार्ममध्ये शिरताच बिबट्याने कोंबड्यांवर ताव मारला. या दरम्यान त्याने तीन ते चार कोंबड्या फस्त केल्या. मात्र, शिकार केल्यानंतर पोल्ट्रीबाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने तो आतमध्येच अडकून पडला. सकाळच्या वेळी पोल्ट्री फार्ममध्ये मालक गेला असता त्याला आतमध्ये बिबट्याची हालचाल दिसली. मालकाने तातडीने वनविभागाला माहिती दिली.

वनविभागाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. पोल्ट्रीच्या चारही बाजूंना जाळी लावून सुरक्षितता सुनिश्चित करण्यात आली. त्यानंतर अधिकाऱ्यांनी बिबट्याला भूलीचं इंजेक्शन दिलं आणि काळजीपूर्वक त्याला जेरबंद करण्यात आलं. काही तास चाललेल्या या थरारक रेस्क्यू ऑपरेशनमुळे गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

गावाच्या आसपास डोंगराळ परिसर असून, शेती व लहानसहान प्राणी यामुळे येथे बिबट्यांचा वावर नेहमीच जाणवतो. परंतु पोल्ट्रीमध्ये थेट शिरून शिकार करणं ही घटना ग्रामस्थांसाठी धक्कादायक होती. सुदैवाने या प्रकारात कोणतीही मानवी जीवितहानी झाली नाही, परंतु पोल्ट्री फार्म मालकाचं नुकसान झालं.

या घटनेमुळे बोरीचीवाडी परिसरात भीतीचं सावट पसरलं आहे. एकीकडे बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे ग्रामस्थांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, तर दुसरीकडे वनविभागाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळल्याची भावना ग्रामस्थांमध्ये व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricketer Retired Today : भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूची अचानक निवृत्ती; करिअरमध्ये घेतल्यात १००० पेक्षा जास्त विकेट

Mrunal Thakur: असं रुपडं देखणं त्याला सुर्याचं रे दान...

Maharashtra Live News Update: छगन भुजबळ नाराज नाहीत, त्यांच्या मनातील शंका दूर करू - मुख्यमंत्री फडणवीस

Public Holiday 2025 : ईदनिमित्त सार्वजनिक सुट्टी आहे की नाही? महत्वाची माहिती आली समोर

आधी मंदिरात लग्न नंतर जंगलात बलात्कार; ६० वर्षीय वृद्धाचं १५ वर्षीय मुलीसोबत हैवानी कृत्य

SCROLL FOR NEXT