Nashik Saam
महाराष्ट्र

Nashik: दुर्दैवी! आई स्वंयपाक करताना चिमुकला बादलीत बुडाला, १० महिन्यांच्या बाळाचा मृत्यू

Nashik Tragedy: नाशिकरोडच्या रोकडोबावाडी परिसरात बुधवारी रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. १० महिन्यांचा रोशन अजय तायडे या चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या बादलीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला.

Bhagyashree Kamble

नाशिकमध्ये एक ह्रदयद्रावक घटना घडली. १० महिन्यांच्या चिमुकल्याचा पाण्याने भरलेल्या बादलीत बुडून मृत्यू झाला आहे. घटनेवेळी आई स्वंयपाक करत होती. बाळ बाजूलाच खेळत असल्याचं तिला वाटत होतं. काही वेळाने रोशन दिसेनासा झाल्यावर शोध घेतला असता तो बादलीत बुडालेल्या अवस्थेत आढळला. या घटनेनंतर कुटुंबावर दुखा:चा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रोशन अजय तायडे असे १० महिन्यांच्या चिमुकल्याचं नाव आहे. चिमुकला आपल्या आईसोबत नाशिकरोडच्या रोकडोबावाडी परिसरात राहत होता. बुधवारी ८- ८:३०च्या सुमारास चिमुकला खेळत होता. त्याची आई स्वंयपाकघरात स्वंयपाक करत होती. काही वेळानंतर बाळाचा आवाज न आल्यावर तिने शोधाशोध केली. तेव्हा चिमुकला बादलीत बुडालेल्या अवस्थेत आढळला.

चिमुकल्याला बुडालेल्या अवस्थेत पाहुन आईने हंबरडा फोडला. बाळाला तात्काळ बिटको रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेनंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ही घटना संपूर्ण परिसराला हादरवणारी असून, रोकडोबावाडी मशिदीजवळील रहिवाशांमध्ये शोककळा पसरली आहे. पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

उमरगामध्ये पोलीस पाटलाच्या मुलाची हत्या

उमरगा येथे १९ मे रोजी पोलीस पाटलाच्या मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही हत्या दारू पिऊन किरकोळ वादातून झाल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी, या प्रकरणात अनेक संशय निर्माण झाले असून आरपीआय (आठवले गट) कडून सीआयडीमार्फत सखोल तपासाची मागणी करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भाजपच्या आमदाराने शिवसेना आमदाराच्या घरी 100 पोलीस मध्यरात्री घरात पाठवले पहा

Local Body Election : भाजपचा प्रचार का करतो? काँग्रेस नेत्याने कारमध्ये कोंबून मारले, नागपूर पोलिसांनी केली अटक

Budh Gochar: 12 महिन्यांनी बुध करणार गुरुच्या राशीत प्रवेश; 'या' राशींच्या घरात लक्ष्मीच्या पावलांनी येणार पैसा

Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

BMC Election : बीएमसीत मनसे ठरणार किंगमेकर? महायुतीला रोखण्यासाठी काँग्रेस भूमिका बदलणार?

SCROLL FOR NEXT