Igatpuri Today News Saam TV
महाराष्ट्र

Nashik News : भांडण सोडवण्यासाठी गेली अन् जीव गमावून बसली; महिलेसोबत घडली भयावह घटना

जाकिया शेख असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे.

अभिजित सोनावणे

नाशिक : कुणाचं भांडण सुरू असेल, तर अनेकदा आपण माणुसकीच्या नात्याने मध्यस्थी करून भांडण सोडवण्याचा प्रयत्न करतो. त्यातच भांडणं तर गावातील असेल, तर अनेकजण मध्यस्थी करून भांडणे सोडवतात. मात्र, काही वेळा असं होतं की, भांडण सोडवताना समोरची व्यक्ती आपल्याच गळ्यात पडते. म्हणजेच काय तर ती आपल्यासोबतच भांडायला सुरूवात करते. नाशिकमधून (Nashik) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली. इगतपुरीमध्ये (Igatpuri) भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला. (Igatpuri Todays News)

नेमकं काय घडलं?

जाकिया शेख असं मृत्युमुखी पडलेल्या महिलेचं नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, इगतपुरीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या एका मुलाचा आपल्या आईसोबत वाद सुरू होता. आई आणि मुलामध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं. ही गोष्ट जाकिया यांच्या लक्षात येताच त्यांनी दोघांना समजावून सांगत भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. (Igatpuri News Marathi Today)

मात्र चांगुलपण दाखवणं जाकिया यांच्या अंगलट आलं. जाकिया यांचीच यांचीच धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी ७ जणांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील आरोपी सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेचीच हत्या करण्यात आल्याने परिसरातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! भाजपच्या बड्या नेत्याच्या भावाला अटक, मारहाण प्रकरण भोवलं

विश्वचषक विजेता कर्णधार भ्रष्टाचारात अडकला, कोणत्याही क्षणी अटक होणार? श्रीलंकेत वातावरण तापलं

Christmas Celebration : ख्रिसमस सेलिब्रेशन करायचे असेल तर, मुंबईतील माउंट मेरी चर्चला नक्कीच भेट द्या

Dhurandhar Collection : 'धुरंधर'ची ४०० कोटींकडे वाटचाल; 'छावा'चा रेकॉर्ड मोडणार? कपिलचा चित्रपट तिकीट खिडकीवर आपटला, वाचा कलेक्शन

Jio Recharge 2026: JIOने दिली खुशखबर! 2026 मध्ये रिचार्ज होणार स्वस्त, फक्त १०३ रुपयांपासून सुरुवात, वाचा संपूर्ण प्लान...

SCROLL FOR NEXT