Nashik ST Bus Accident Saam TV
महाराष्ट्र

Nashik News: नाशिक-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वारांना चिरडत एसटीने घेतला पेट, ४ ते ५ जणांचा मृत्यू

एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला आहे. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे.

अभिजित सोनावणे

Nashik ST Bus Accident : नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक-सिन्नर (Nashik News) महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला आहे. या भीषण अपघातात चार ते पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील (Bus Accident) नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं. इतकंच नाही तर या बसने समोर असलेल्या एका एसटी बसला देखील जोरदार धडक दिली.

ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये चार ते पाच दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे तर बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला. त्याचवेळी बसमधून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांनी आपला जीव वाचवण्यासाठी बसच्या आपत्कालीन खिडकीतून बाहेर उड्या घेतल्या.

दरम्यान, या भीषण अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी सुखरूप बाहेर काढलं. या अपघातात आतापर्यंत चार ते पाच दुचाकीस्वारांचा जणांचा मृत्यू झाला असून बसमधील अनेक प्रवाशी गंभीर झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: परतीच्या पावसामुळे भातपिकाचे मोठे नुकसान

Ashok Chavan : अशोक चव्हाण भाजपसोडून काँग्रेसमध्ये घरवापसी करणार का? नाना पटोलेंच्या वक्तव्याने विषय संपला

Mumbai : मुंबई लोकलमध्ये पॉवर बँकचा अचानक स्फोट! बॅगला आग लागल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण

Island Forts : चारही बाजूंनी पाणी अन्...; बेटांवर असलेले जगातील ७ रहस्यमय किल्ले, भव्यता पाहून व्हाल थक्क

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीने गुपचूप बांधली लग्नगाठ; PHOTO शेअर करून चाहत्यांना सुखद धक्का, नवरा आहे तरी कोण?

SCROLL FOR NEXT