Nashik News 
महाराष्ट्र

Nashik : संक्रांतीच्या दिवशी नाशिक हादरलं, आधी बापानं आयुष्य संपवलं, नातेवाईकांना बोलवलं, हॉस्पिटलला नेईपर्यंत मुलानेही जीव सोडला

Nashik father-son jeweler duo suicide by poison : पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रशात आत्मारामशेठ गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव अशी मृतांची नावे आहेत.

Namdeo Kumbhar

Nashik News : ऐन संक्रांतीच्या सणामध्ये नाशिक हादरलेय. सराफ व्यवसायिक पिता-पुत्राने राहत्या घरात विष प्राशन करत आयुष्य संपवलेय. या धक्कादायक घटनेनंतर नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. प्रशात आत्मारामशेठ गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव अशी आत्महत्या करणाऱ्या पिता-पुत्राचे नाव आहे.

नाशिकच्या सराफा बाजारात असलेल्या ए. एस. गुरख अँड सन्स सराफा दुकानाचे संचालक असलेल्या सराफा व्यावसायिक पिता-पुत्राने राहत्या घरात आयुष्य संपवले. संक्रांतीच्या आदल्या दिवशी सोमवारी पाण्यात विष टाकून प्राशन करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. प्रशात आत्मारामशेठ गुरव आणि अभिषेक प्रशांत गुरव अशी मृतांची नावे आहेत.

या घटनेने संपूर्ण पंचवटीसह सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. या दोघाही पिता-पुत्रांनी आत्महत्या का केली, याचे कारण अजून समजले नसून मात्र गुरव कुटुंबीयांवर असलेल्या लाखो रुपयांच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून दोघांनी आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी परिसरात चर्चा आहे. काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजा परिसरात असलेल्या रामराज्य संकुल अपार्टमेंटमध्ये गुरव कुटुंब वास्तव्यास आहे.

सोमवारी सकाळी गुरव पिता- पुत्र घरी असताना प्रशांत गुरव हे घरात झोपलेल्या अवस्थेत होते. त्यावेळी मुलगा अभिषेक याने त्यांना आवाज देऊन उठविण्याचा प्रयत्न असता, त्यांनी कुठलीही हालचाल केली नाही आणि प्रतिसाद दिला नाही. अभिषेक याने हिरावाडी परिसरात राहणाऱ्या त्यांच्या आत्या संगीता गुरव व यांना घरी बोलावून घेतले. दरम्यान, अभिषेकच्या तोंडातून फेस येऊन हात-पाय वाकडे झाल्याने त्यालाही त्रास होऊ लागल्याचे त्याचा भाऊ सागर गुरवच्या लक्षात आले. त्याने सकाळी सात वाजता अभिषेक याला तत्काळ छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेल्या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. या घडलेल्या घटनेमुळे पंचवटी परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

Maharashtra Live News Update: उठेगा नही साला हा डायलॉग ठाकरेंनाच शोभतो - एकनाथ शिंदे

Sushil Kedia Tweet : महाराष्ट्र जोपर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या हातात आहे, तोपर्यंत...' सुशील केडिया यांचं फडणवीसांना टॅग करत ट्वीट

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

SCROLL FOR NEXT