Surabhi Jayashree Jagdish
आजकाल दिसायला हेल्दी आणि फिट वाटणाऱ्या व्यक्तीही अचानक हृदयविकाराच्या झटक्याचे बळी ठरतायत. यामागचे एक मोठे कारण म्हणजे लपलेल्या हृदयाच्या समस्या ज्याबद्दल लोकांना माहिती नसतं.
जिम जॉइन करण्यापूर्वी किंवा व्यायाम सुरू करण्यापूर्वी काही आवश्यक तपासण्या करणं गरजेचं आहे. यामुळे शरीर व्यायामासाठी तयार आहे की नाही हे समजतं.
३० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी काही टेस्ट करणं आवश्यक आहे. तसंच जे लोक पहिल्यांदाच किंवा दीर्घ काळानंतर जिम किंवा व्यायाम सुरू करतायत त्यांच्यासाठीही या टेस्ट महत्त्वाचे आहेत.
ECG टेस्ट हृदयाची धडधड आणि त्याचे इलेक्ट्रिकल सिग्नल रेकॉर्ड करते. यामुळे काही गडबड, ब्लॉकेज किंवा हृदयविकाराचे संकेत ओळखता येतात.
2D Echo म्हणजे अल्ट्रासाऊंड तपासणी ज्यामुळे डॉक्टर हृदयाची रचना आणि कामाची माहिती मिळते. यामुळे हायपरट्रॉफिक कार्डिओमायोपॅथी सारख्या आजारांचा शोध लागतो.
TMT टेस्टमुळे व्यायामादरम्यान हृदय कसं काम करतं हे समजतं. यामुळे व्यायामादरम्यान हृदयाच्या समस्या ओळखता येतात. ही टेस्ट हाय-इंटेन्सिटी वर्कआउट किंवा वेट ट्रेनिंग करणाऱ्यांसाठी उपयुक्त आहे.
लिपिड प्रोफाइल टेस्टमध्ये कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडचं प्रमाण समजतं. तर HbA1c तपासणीत मागील तीन महिन्यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कळतं. या दोन्ही तपासण्या डायबिटीज, प्रीडायबिटीज आणि मेटाबॉलिक सिंड्रोम ओळखण्यात मदत करतात.
ही टेस्ट शरीरातील कोणत्या भागाला सूज आली आहे का याची माहिती देते. ही सूज धमन्यांमध्ये प्लाक तयार करून हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकचा धोका वाढवते.