Son Kills His 80-Year-Old Mother Nashik AI
महाराष्ट्र

'कंटाळा आल्याने आईला संपवलं', लेकाकडून हादरवणारं कृत्य, नाशिकमध्ये खळबळ

Son Kills His 80-Year-Old Mother: 'कंटाळा आला होता, म्हणून आईला संपवलं', लेकानं आधी आईचा गळा दाबला. नंतर खून केला. नाशिक हादरलं.

Bhagyashree Kamble

  • मुलाकडून आईची निर्घृण हत्या.

  • आरोपीनं स्वत: पोलिसांसमोर कबुली दिली.

  • पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला.

आई - मुलाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना नाशिकमधून उघडकीस आली आहे. पोटच्या मुलानं त्याच्या आईची निर्घृण हत्या केली. हत्येनंतर त्यानं स्वत: पोलिसांशी संपर्क साधला आणि हत्या करण्यामागचं कारण सांगितलं. 'कंटाळा आला होता, म्हणून आईची हत्या केली', असं नराधम मुलानं आईची हत्या करण्यामागचं कारण सांगितलं. या घटनेची माहिती परिसरात पसरताच स्थानिकांना धक्का बसला. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

ही संतापजनक घटना नाशिकमधील शिवाजीनगर परिसरातून उघडकीस आली आहे. अरविंद मुरलीधर पाटील असे आरोपीचे नाव आहे. तर, यशोदाबाई पाटील (वय वर्ष ८०)असे वृद्ध महिलेचं नाव आहे. घटनेच्या दिवशी मुलानं आईचा गळा दाबून खून केला. नंतर पोलीस ठाण्यात पोलिसांसमोर गुन्हा कबूल केला.

यानंतर पोलिसांनी पाटील याच्या घराची झडती घेतली. तपासादरम्यान, पोलिसांना वृद्ध महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला. नंतर खुनाचा गुन्हा दाखल केला. 'कंटाळा आला होता, म्हणून मी माझ्या आईचा गळा दाबून खून केला. मला अटक करा', असं म्हणत आरोपी मुलानं गुन्हा कबूल केला.

नाशिक रोड पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, अरविंद पाटील हे मानसिक रूग्ण असल्याची माहिती आहे. अरविंद विवाहित असून, त्याच्या बिघडलेल्या मानसिक स्थितीमुळे त्याची पत्नी त्याला सोडून गेली. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: निष्ठावान राहिलो ही आमची चूक होती का? पक्षातून हकालपट्टी होताच शिवसेना नेते ढसाढसा रडले

Maharashtra Live News Update: अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेमध्ये काँग्रेसची आढावा बैठक

Surya Gochar: ग्रहांचा राजा सूर्य शनीच्या नक्षत्रात करणार प्रवेश; 'या' राशींच्या घरी येणार लक्ष्मी, सोन्यासारखे दिवस होणार सुरु

Post Meal Walking Benefit: जेवल्यानंतर १० मिनिटे चालल्यावर होतात जबरदस्त फायदे

Manoj Jarange: नार्कोटेस्टला येतो म्हणणारे लपलेत; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल|VIDEO

SCROLL FOR NEXT