Nashik Savala Ghat accident साम टीव्ही मराठी
महाराष्ट्र

उतारावर ब्रेक फेल, ट्रकच्या धडकेनंतर कार पुढच्या ट्रकमध्ये घुसली; कारचा चक्काचूर; ४ जणांचा मृत्यू, घाटात भयंकर अपघात

Nashik Savala Ghat accident : नाशिकच्या सावळा घाटात ब्रेक फेल झालेल्या ट्रकने कारला जोरदार धडक दिल्याने कार दोन ट्रकांमध्ये चिरडली गेली. या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.

Namdeo Kumbhar

अजय सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

Four killed in Savala Ghat Nashik accident : नाशिकमधील सावळा घाटात मंगळवारी सायंकाळी थरारक आणि भीषण अपघात झाला. घाटातील तीव्र उतारावर दोन ट्रकांच्या मध्ये कारचा चेंदामेंदा झाला. या विचित्र अपघातात कारमधील ४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर १ जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, दोन्ही ट्रकांच्या मध्ये सापडल्याने कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.

नेमका कसा घडला अपघात?

मिळालेल्या माहितीनुसार, पेठ-दिंडोरी हद्दीलगत असलेल्या सावळा घाटातील तीव्र उतारावरून एक 'इको' कार जात होती. याच वेळी कारच्या मागून येणाऱ्या एका ट्रकचे ब्रेक अचानक निकामी (फेल) झाले. ब्रेक फेल झाल्यामुळे चालकाचे ट्रकवरील नियंत्रण पूर्णपणे सुटले आणि हा वेगवान ट्रक समोर जाणाऱ्या इको कारवर जाऊन जोराने धडकला. घाटात तीव्र उतार असल्याने मागून मिळालेल्या भीषण धडकेमुळे इको कार थेट पुढे चाललेल्या दुसऱ्या ट्रकच्या मागील बाजूस अतिशय वेगाने जाऊन धडकली. दोन मोठ्या ट्रकांच्या मध्ये कारचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला.

३ जणांचा जागीच मृत्यू, उपचारादरम्यान एकाचा मृत्यू

या थरारक अपघातात कारमधील ३ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोन जण गाडीत गंभीर जखमी अवस्थेत अडकले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू करून जखमींना कारबाहेर काढले. त्यांना उपचारासाठी तातडीने नाशिक येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान आणखी एका जखमीचा मृत्यू झाला. या अपघातात एकूण ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका गंभीर जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटातील वाहतूक काही काळ ठप्प

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर घाटातील दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला सारली आणि काही तासांच्या प्रयत्नांनंतर सावळा घाटातील वाहतूक पूर्ववत केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hartalika Fast : हरतालिकेचा उपवास कधी सोडावा? योग्य वेळ काय? जाणून घ्या

Monday Horoscope: गणरायाचे आगमन अन् 'या' ३ राशींचे नशीब चमकणार; धनलाभासोबत मिळेल मोठी खुशखबर!

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

SCROLL FOR NEXT