Nashik Coaching Classes Saam tv
महाराष्ट्र

Nashik Breaking : क्लासमध्ये बेंचवर बसण्यावरून वाद, पोरांचा जोरदार राडा, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

Nashik Coaching Classes : नाशिकच्या सातपूर परिसरातील एका खासगी क्लासमध्ये दहावीच्या विद्यार्थ्याची बेंचवर बसण्याच्या वादातून हत्या झाली. याप्रकरणी पोलिसांनी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.

Alisha Khedekar

  • नाशिकच्या खाजगी क्लासमध्ये विद्यार्थ्याची निर्घृण हत्या

  • बसण्याच्या वादातून दोन अल्पवयीन मित्रांनी यशराजला मारहाण केली

  • गंभीर जखमेमुळे रुग्णालयात उपचारादरम्यान यशराजचा मृत्यू

  • सातपूर पोलिसांनी आरोपी बालकांना ताब्यात घेऊन तपास सुरू केला

नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने सध्या शहरात खळबळ उडाली आहे. खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेत असलेल्या दहावीच्या विद्यार्थ्याची बेंचवर बसण्याच्या वादातून हत्या करण्यात आली. मयत विद्यार्थ्याचे नाव यशराज गांगुर्डे असून, तो सातपूर परिसरातील रहिवासी होता.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी यशराजचा त्याच क्लासमध्ये शिकणाऱ्या दोन अल्पवयीन मित्रांसोबत बसण्याच्या जागेवरून वाद झाला होता. हा वाद तात्पुरता थांबला असला तरी, त्याचे परिवर्तन शनिवारी हिंसक प्रकारात झाले. दोन्ही अल्पवयीन विद्यार्थ्यांनी यशराजला क्लासच्या आवारात बोलावून घेतले आणि त्याच ठिकाणी हाताने मारत, लाथाबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली.

या हल्ल्यात यशराज गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, डोक्याला झालेल्या आघातामुळे त्याचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनेनंतर सातपूर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही 'विधी संघर्षातील बालक' या श्रेणीत मोडत असल्याने त्यांच्यावर बाल न्याय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.

शाळकरी वयातील मुलांमध्ये वाढत चाललेली हिंसक प्रवृत्ती आणि खाजगी शिकवण्या देणाऱ्या क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न यामुळे पुन्हा ऐरणीवर आला आहे. एका किरकोळ कारणावरून घडलेली ही जीवघेणी घटना पालकांमध्ये चिंता निर्माण करणारी ठरत आहे. सध्या पोलिसांकडून सविस्तर चौकशी आणि इतर विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवण्याचे काम सुरू आहे.

ही घटना कुठे घडली?

ही घटना नाशिकच्या सातपूर परिसरातील ज्ञानगंगा खाजगी क्लासमध्ये घडली.

मयत विद्यार्थ्याचे नाव काय आहे?

मयत विद्यार्थ्याचे नाव यशराज गांगुर्डे आहे.

हत्या का झाली?

क्लासमध्ये बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादातून दोन अल्पवयीन मित्रांनी यशराजला मारहाण केली.

पोलिसांकडून काय कारवाई झाली आहे?

सातपूर पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून बाल न्याय कायद्यानुसार कारवाई सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High Blood Pressure : काजू-बदाम नाही; हाय BP च्या रुग्णांसाठी 'हा' ड्रायफ्रूट वरदान

Mumbai Local: मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, डोंबिवलीजवळ लोकलचा डबा रुळावरून घसरला; प्रवाशांचे हाल, VIDEO समोर

Maharashtra News Live Update: TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता; ₹२००० मिळवण्यासाठी हे काम लगेच करा

Pune Tourism : २००० वर्षांहून अधिकचा ऐतिहासिक वारसा जपतेय 'हे' ठिकाण, लोखंडासारखा मजबूत आहे किल्ला

SCROLL FOR NEXT