PM Kisan Yojana: या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा हप्ता; ₹२००० मिळवण्यासाठी हे काम लगेच करा

PM Kisan Yojana 23rd Installment Update: पीएम किसानचा २३वा हप्ता कधीही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो. दरम्यान, काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाहीये. हप्ता मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात आधी हे काम करायचे आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan YojanaSaam tv
Published On
Summary

पीएम किसान योजनेचा २३वा हप्ता कधी येणार?

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसानचा लाभ

शेतकऱ्यांनी हे काम लगेच करा

केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यातील एक योजना म्हणजे पीएम किसान योजना. या योजनेत शेतकऱ्यांना वर्षभरात ६००० रुपये दिले जातात. या योजनेचा २३ वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. हा हप्ता कधी देणार आहे, याबाबत कोणतीही अपडेट समोर आलेली नाही. मात्र, या योजनेचा हप्ता अनेक शेतकऱ्यांना मिळणार नाहीये.

PM Kisan Yojana
PM Kisan yojana : ही गोष्ट केली तरच पीएम किसान योजनेचा हफ्ता मिळणार, शेतकर्‍यांच्या कामाची गोष्ट

या शेतकऱ्यांना मिळणार नाही लाभ (PM Kisan Yojana These Farmers Will not Get Installment)

पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना एका चुकीमुळे लाभ मिळणार नाहीये.पीएम किसान योजनेसाठी शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. ईकेवायसी न केल्यास शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. तुमचे आधी डिजिटल व्हेरिफिकेशन होणार आहे त्यानंतरच शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे. याचसोबत शेतकजमीन व्हेरिफिकेशनदेखील आवश्यक आहे.

तुमच्या शेतजमीनीचे सरकारी रेकॉर्ड असणे गरजेचे आहे. अनेकदा शेतकऱ्यांच्या जमीनीची माहिती पोर्टलवर अपडेट नसते. त्यामुळे शेतकऱ्यांना हप्ता मिळत नाही.यासाठीच शेतकऱ्यांना आधी त्यांच्या जमिनीचे व्हेरिफिकेशन करायचे आहे.

जर तुम्ही फेस ऑथेंटिकेशन किंवा ओटीपीद्वारे केवायसी केले नसेल तर ते काम लगेच करा. तुम्ही तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयात जाऊन जमीनीचे रेकॉर्ड चेक करायचे आहे. जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. दरवेळी हप्ता येण्याआधी तुम्हाला हे काम करायचे आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! पीएम किसानचा २३ वा हप्ता हवाय? मग 'हे' काम लगेच करा

बँक खाते आणि आधार लिंक नसणे

पीएम किसानचा हप्ता मिळवण्यासाठी तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक असणे गरजेचे आहे. तुमच्या खात्यात डीबीटीद्वारे पैसे जमा केले जातात. जर तुमचे बँक खाते आणि आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे तुम्ही आधार सीडिंगची प्रक्रिया पूर्ण करा. याचसोबत तुम्ही बेनिफिशियरी स्टेट्‍स चेक करा त्यामध्ये तुम्हाला पैसे येणार की नाही हे कळणार आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळतात ₹१२०००; पीएम किसानशिवाय या योजनेचा मिळतो लाभ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com